सिंदी रेल्वे नगर पालिकेच्या वाढीव टॅक्स प्रकरणी 22 ऑगस्टला चक्का जाम आंदोलन, हजारो नागरिक होणार सहभागी.

चक्का जाम आंदोलनात सिंदी रेल्वे शहरातील मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग व जनतेचा राहणार प्रतिसाद.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सिंदी रेल्वे नगर पालिकेच्या वाढीव टॅक्स प्रकरणात २२ ऑगस्ट च्या चक्का जाम आंदोलना सदर्भात सर्व राजकीय पक्ष व संघटनेची सभा संपन्न झाली.

सिंदी रेल्वे नगर पालिकेने टॅक्स मालमत्ता कर मध्ये ३५ ते ४० टक्क्याने वाढ केली असून ती वाढ अवाजवी आहे. ती वाढ कोणत्या कायद्यात आणि कोणत्या आधारावर वाढ केली हे अजूनही निष्पन्न झाली नाही मोठ्या प्रमाणात झालेली कर वाढ कमी करण्यासाठी सिंदी रेल्वे येथील शिष्ट मंडळाने व जनतेनी चार वेळा निवेदने दिले. नगर पालिकेच्या मुख्यधिकारी यांना घेराव घातला, २१ जुलै रोजी नगर पालिकेवर हजारोच्या संख्येने भव्य जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढला. या मोर्चात प्रभारी मुख्यधिकारी यांनी एक महिन्यात टॅक्स कमी करणार असे सर्वान समोर आश्वासन दिले. परंतु एक महिना लोटूनही सिंदी रेल्वे शहर वासियांच्या मागण्यापूर्ण झाल्या नाही. त्यांना समाधान कारक उत्तर सुद्धा मिळाले नाही. तसेच कायमस्वरुपी मुख्याधिकारी ८ ते १० दिवसात मिळणार असे सुद्धा नागरिकांना सांगण्यात आले होते परंतु महिना झाला नाही कायम स्वरुपी मुख्याधिकारी मिळाला नाही अव्याढव्य टॅक्स कमी झाला. म्हणून आज रोजी सिंदी रेल्वे शहरातील सर्व राजकीय पक्ष व विविध संघटना व खवळलेल्या जनतेनी २२ ऑगस्ट रोजी सिंदी रेल्वे शहरात चक्का जाम आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्या सदर्भात सिंदी रेल्वे येथे बैठक सभा आयोजित करण्यात आली होती ती बैठक सभा पार पडली.

यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले माजी नगराध्यक्ष बबनरावजी हिंगणेकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी न.पा.उपाध्यक्ष सुधाकर खेडेकर, माजी न.पा. उपाध्यक्ष अशोकब कलोडे, प्राचार्य अशोक कलोडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शिवसेनेचे सचिन लांबट, अमोल बोरकर, नगरसेवक रामवतार तूरक्याल, युवक शहर अध्यक्ष तुषार हिंगणेकर, सुनील शेंडे, फिरोज बेहरा, युगल अवचट, बबलू खान, नगरसेविका सौ. मदनकर, नगरसेविका पाटील, जगदीश बोरकर, निळकंठ घवघवे, अरविंद बोरकर, अशोक हिंगणेकर, राजु कोपरकर, गुड्डू कुरेशी, धनराज झिलपे, सुभाष तुमाने, अतुल काळवाडे, सोनू बोरकर, जगदीश बोरकुटे, सुभाष, पंकज बावणे आदी उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

19 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

21 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago