सिंहगड रोड पोलीसांची उलेखनिय कामगिरी ! दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीच्या अवळल्या मुसक्या

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन हादीत रेकॉर्ड वरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगडरोड पो स्टे पुणे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, सहा.पो.उप.निरीक्षक आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार सागर शेडगे, पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, पोलीस अंमलदार शिवाजी क्षिरसागर, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, पोलीस अंमलदार अमोल पाटील, पोलीस अंमलदार स्वप्नील मगर, पोलीस अंमलदार दक्ष पाटील, पोलीस अंमलदार विकास पांडोळे याचेसह पोलीस स्टेशन हद्दीत दि. १४/०८/२०२३ रोजी रात्री २२/०० वा ते दि.१५/०८/२०२३ रोजी रात्री ०१/०० वा चे दरम्यान कोम्बींग ऑपरेशन राबवित असताना वाहन चोरीच्या गुन्ह्याना आळा बसण्यासाठी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत कॅनोल रोड तुकाईनगर येथे आलो असता एक हिरो होन्डा कंपनीची पॅशन प्रो दुचाकी गाडी संशयीत रित्या वडगावचे दिशेने येत असताना दिसल्याने सदरची गाडी ही वरील स्टॉफचे मदतीने २२/१० वा. थांबवुन चालकास त्याचे लायसन्स व गाडीचे कागद पत्रात बाबत चौकशी केली तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्याबाबत आम्हास संशय आल्याने त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अभिषेक दशरथ वाघमारे वय २२ वर्षे रा. सव्र्व्हे नंबर १३३. पेट्रोलपंपा समोर, दांडेकर पुल पुणे आल्याचे सांगितले त्याचे ताब्यातील दुचाकी गाडी बाबत त्याचेकडे जागीच सखोल तपास केला असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने सदर गाडी बाबत पोलीस स्टेशन अभिलेख पाहता सदरची गाडी सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ३८५ / २०२३ भादवि कलम ३७९ या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात दि. १४/०८/२०२३ रोजी २३/३० वा अटक करुन त्याचेकडे अधिक तपास करता त्याने सिंहगडरोड पोलीस स्टेशन परीसरातुन आणखी दोन दुचाकी गाड्या चोरी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्याकडुन सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील तिन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असुन तीन गुन्ह्याची उखल करण्यात आली आहे.

अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. सुहेल शर्मा सो, मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ – ३, श्री आप्पासाहेब शेवाळे सो. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, श्री अभय महाजन साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, सहा.पो.फौज. आबा उत्तेकर पोलीस अंमलदार, संजय शिंदे, विकास पांडोळे, विकास बांदल, अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, सागर शेडगे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

53 mins ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

23 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago