विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- कोपरगाव तालुक्यातील मांढरे वस्ती व मोरवीस मधील शेकडो आदिवासी समाजातील लोक एकत्र येऊन आपल्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढला. मागील अनेक दिवसापासून तालुक्यातील आदिवासी सह बहुजन समाज अन्याय होत आहे. शासनाच्या योजनेचा लाभा ते वंचित असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे त्यांच्या मोठ्याप्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या विविध मागण्यासाठी एकलव्य आदिवासी परिषदेचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
आदिवासी समाज तसेच बहुजन समाज बांधवांना राहत्या जागेत घरकुल बांधुन द्यावीत तसेच गाव पंचनाम्याच्या आधारे तात्काळ जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड द्यावेत, अशा विविध मागणीसाठी एकलव्य आदिवासी परिषदेच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
एकलव्य भिल्ल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात मांढरे वस्ती, मुर्शतपूर येथे आदिवासी बहुजन समाजातील समाज बांधव गट नंबर ५५ / ५ मध्ये पिढ्यान पिढ्यांपासून राहतात परंतु काही लोकांनी पाटबंधारे कालवा यांच्या विरोधात जाणून-बुजून आदिवासी बहुजन समाज बांधवांना त्रास देण्याच्या हेतूने न्यायालयात तक्रारी दाखल करून अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे. परंतु हे जर अतिक्रमण काढायचे असेल तर, शेकडो कुटुंबांचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. मोरवीस या गावात आदिवासी बहुजन समाजातील दीडशे ते दोनशे घर आज पिढ्यान पिढ्यांपासून राहतात तरीपण या जागेवर अद्याप घरकुल दिले जात नाही. ही राहती जागा समाज बांधवांच्या नावे करून त्यांना तातडीने घरकुल देण्यात यावे, तसेच कोपरगाव तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी गावपंचनाम्याच्या आधारे जातीचे दाखले रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मंगेश औताडे, प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे, आरपीआयचे राज्य सचिव दीपक गायकवाड, नवनाथ वाघ, अंबादास धनगर, प्रमोद बारहाते, शोभाताई सोनवणे, गुलाब बर्डे, आदिती बाराहाते, अशोकराव वाघमारे, निसार शेख, दुशिंग यांची भाषणे झाली. मोर्चात कोपरगाव तालुक्यासह चांदवड, नांदगाव, कळवण, सटाणा, निफाड तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…