वर्धा सायबर पोलिस स्टेशनने तांत्रीक पद्धतीने तपास नागरिकांची फसवणुकीचा टोळीचा केला भांडाफोड, दोन आरोपीला ठोकल्या बेड्या.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पोलिस अधिक्षक कार्यालय वर्धा येथे सायबर पोलिस स्टेशनची स्थापना केली आहे. त्यामुळे महिनाभरात सदर गुन्ह्यांचा छडा लावण्यात सायबर पोलिस स्टेशन ला यश प्राप्त झाले आहे. 10 जून 2023 रोजी फिर्यादी ही घरी हजर असताना फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर कॉल आला. आपले पार्सल मध्ये 6 किलो कापड, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट कार्ड व 140 ग्रॅम एम. डी. ड्रग्स नावाचे अंमली पदार्थ सापडले आहे, आपण सायबर पोलिसांशी बोला असे सांगून भिती दाखवून व धमकावून फिर्यादीला वेगवेगळे कारण सांगुन वेगवेगळया अंकाऊंटमध्ये एकूण 247,776 रुपयांची फसवणूक केली, अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन दिनांक 27 जून 2023 रोजी सायबर पोलिस स्टेशन वर्धा येथे अप क्र. 01/2023 कलम 419, 420 भादवि सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा संपुर्ण तांत्रीक पद्धतीने तपास केला असता व संपुर्ण तांत्रीक बाबींचे विश्लेषण करुन सदरचे आरोपी नांदेड व औरंगाबाद येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये सायबर पो.स्टे मार्फत एक पथक तयार करुन दिनांक 17 जुलै 2023 रोजी सदरचे पथक हे नांदेड येथे पोहचून आरोपी अंबादास जनार्धन कांबळे वय 35 वर्ष रा. विष्णु नगर, नांदेड यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे सोबत आरोपी अनिल संभाजी निकम वय 49 वर्ष रा. द्वारकाधीश नगर, औरंगाबाद हासुद्धा असल्याचे सांगितल्याने सदरचे पथक नांदेड येथून तात्काळ औरंगाबाद येथे पोहचून आरोपीचा शोध घेतला. आरोपी अनिल संभाजी निकम यास ताब्यात घेतले. यावेळी या आरोपींकडून गुन्हयात वापरण्यात आलेले बँक खात्याचे 1 चेक बुक, 2 मोबाईल, 7 एटीएम कार्ड असा एकुण 20,000 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या बँक खात्याचे निरीक्षण केले असता त्यांच्या खात्यात कोटींची उलाढाल झालेली असल्याचे निदर्शनास आलेले आहे. आरोपींकडून महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कांचन प. पांडे, सायबर पोलिस स्टेशन वर्धा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात व निर्देशाप्रमाणे पोलिस अंमलदार वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रंजीत जाधव,
अनुप राऊत, अमित शुक्ला, अनुप कावळे, प्रतिक वांदीले,मपोशि लेखा राठोड सर्व सायबर पोलिस स्टेशन वर्धा यांनी केली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

57 mins ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

23 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago