“ रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराकडुन ६.३०,७५० रु किमतीचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत” गुन्हे शाखा युनिट २ ची उल्लेखनीय कामगीरी.

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो, रितेश कुमार यांनी पुणे शहरातील रॉबरी, घरफोडी बारी, चैन स्नॅचींग तसच पाहीजे फरारी, तडीपार आरोपीचा शोध घेवून रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकींग करण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-२ प्रभारी अधिकारी श्री नंदकुमार विडवई म सहा.पो.नि. वैशाली भोसले व युनिट २ कडील पोलीस अंमलदार पो. हवा. १७८० मोकाशी, पो.हवा २५७२ जाधव, पो.ना. ६६०७ सरडे, पो.शि.८४०७ सोनुने, पो.शि. ८१३६ जाधव, पो.शि.८८३४ चव्हाण यांची टिम तयार करून, त्यांना महत्वाचे मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने आज रोजी पेट्रोलींग दरम्यान युनिट-२ कडील पोलीस अमलदार गजानन सोनुने व संजय जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉडवरील अट्टल घरफोडी चोरी करणारा इसम नामे जयवंत ऊर्फ जायच्या गायकवाड हा मिनाताई ठाकरे वसाहती येथील निम दिप मित्रमंडळाचे जवळ चोरीचे सोन्याचे दागीने विकण्यासाठी टी.व्ही.एस. (अपाची) कंपनीची गाडी क्रमांक एम.एच. १४ एफ. एल. ७०२७ या गाडीसह आलेला आहेत. सदर बाबत युनिट २. प्रभारी मा. पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर युनिट-२ कडील अधिकारी व अमलदार यांनी बातमीच ठिकाणी खाजगी वाहनाने जावुन सापळा रचुन शिताफीने आज दि. २०/०८/२०२३ रोजी १०.३० वा. ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव जयवंत ऊर्फ जायड्या गोवर्धन गायकवाड वय ३४ वर्षे, रा. डी.पी.रोड, आंबेडकर वसाहत, सुरेश प्रोव्हीजन थे बाजुला आंध पुणे असे असल्याचे सांगीतले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन ५०७ ग्रैम वजनाचे सोन्याचे दागिने, टि.व्ही.एस. (अपाची) दुचाकी गाडी, दागिने वजन करण्याची इलेक्ट्रॉनिक मशिन व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यारे असा सर्व मिळून किमंत ६.३०,७५०/- रु चा मुद्देमाल मिळुन आलेला असुन, समर्थ पोलीस स्टेशन गु.र.नं. १८६ / २०२३ भा.द.वि. कलम ४५४.४५७.३८० प्रमाणे गुन्हयाची उकल करण्यात युनिट-२ ला यश आले आहे. त्यास वैदयकीय तपासणी करून पुढील तपासकामी समर्थ पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आलेले आहेत.. सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोरी करणारा इसम असुन तो गेल्या महिन्यामध्ये जेल मधुन जामीनावर बाहेर आलेला होता. त्याचेवर आज तागायत घरफोडी चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, सहा. पो. आयुक्त गुन्हे १ श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई. म. सपोनि वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, संजय जाधव, उज्वल मोकाशी, निखिल जाधव, प्रमोद कोकणे, गणेश थोरात सर्व नेमणुक गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर यांनी केलेली आहे

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago