डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महारष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पिंपरी:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका हॉटेल मधील पुरुषांच्या शौचालयात मोबाईल फोन सुरू ठेवून ग्राहकांचे रेकॉर्डिंग करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादाय प्रकार प्राधिकरण निगडी भागातील गीता पावभाजी हॉटेल येथे रविवार (ता. 20) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास समोर आला आहे.
गीता पावभाजी हॉटेल येथे हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अवैधरित्या पुरुषांच्या शौचालयात मोबाईल फोन सुरू ठेवून ग्राहकांचे खाजगी गोष्टीचे रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ही बाब हॉटेल मध्ये नास्ता करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या लक्षात आल्याने या घटनेचा भांडाफोड झाला. यावेळी हॉटेलच्या व्यवस्थापकांनीच आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. इराप्पा शिवबा पांढरे वय 22 वर्ष असे अटक केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी गौरव प्रकाश सूर्यवंशी वय 28 वर्ष रा. वेंकटेश निवास श्रीकृष्ण नगर विठ्ठलवाडी आकुर्डी यांनी पोलिसात माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवार दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास गौरव सूर्यवंशी हे त्यांचे मॅनेजर सचिन माने यांचा मित्र किरण लोहार व सचिन माने यांच्यासह प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटल समोर गीता पावभाजी येथे पावभाजी खाण्यासाठी गेले होते. दरम्यान मॅनेजर सचिन माने हे हॉटेल मधील शौचालयात फ्रेश होण्यासाठी गेले. त्यावेळी त्या वॉशरूममध्ये एक ओपो कंपनीचा लाल रंगाचा मोबाईल हँडसेट एका पेपरमध्ये गुंडाळून सुरू असलेल्या त्याच्या आढळून आला, सचिन माने याने त्वरित ही बाब आपल्या मित्रांना सांगितले गौरव सूर्यवंशी आणि त्याच्या मित्रांनी ही बाब हॉटेल व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिली.
गीता पावभाजी हॉटेल व्यवस्थापक विजय वर्धप्पा यांनी या प्रकरणाची गंभीर घेत मोबाईल धारकाचा शोध घेतला असता तो मोबाईल फोन त्याच्याच हॉटेल मध्ये काम करणारा कर्मचारी इराप्पा पांढरे याचा निघाला. हॉटेल व्यवस्थापक विजय वर्धापा यांनी कर्मचारी इराप्पा पांढरे याला बोलावून त्या मोबाईल संबंधी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने काहीही उत्तर दिले नाही त्याचा मोबाईल फोन तपासला असता त्याच्यामध्ये शौचालयातील पुरुषांच्या काही सेकंदाचे खाजगी चित्रिकरण आढळून आले. हॉटेल व्यवस्थापक विजय वर्धपा यांनी त्वरित ही बाब पोलिसांना सांगितली आणि कर्मचारी इराप्पा पांढरे याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा पुढील तपास प्राधिकरण पोलीस चौकीतील पोलीस नाईक कदम मॅडम करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…