विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोपरगाव:- ऑगस्ट महिना संपायला आला असला तरी हवा त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीच्या पिकाला पाऊसाची आवश्यक आहे. पण पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरमी वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. यामुळे पिकांनी माना टाकल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने अहमदनगर जिल्ह्या कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करने बाबत स्वराज्य संघटनेच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ऑगस्ट महिना अखेर पर्यंत शासनाचा वतीने तलाठी यांना आदेश देऊन पंचनामे करण्यात यावे. अन्यथा १ सप्टेंबर नंतर तहसील कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल पुढील सर्व जबाबदारी शासनाची राहिलं असे निवेदन देताना बोलण्यात आले.
यावेळी स्वराज्य संघटना कोपरगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल भुजाडे, उपतालुका अध्यक्ष राजेंद्र कुरे, शेतकरी आघाडी प्रमुख संतोष मोहन पाटील, युवक तालुका अध्यक्ष हर्षल चिकणे, वाहतूक आघाडी दिनेश जरांड, तालुका संघटक शुभम पिलाई,युवक कार्याध्यक्ष नेताजी अजगे यांसह आदी पदाधीकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…