रुग्णालयातील परिचारिका सीमा मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करा: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट निर्देश.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकरणाची गंभीर दखल; चौकशी समिती स्थापन करण्याच्या ना.मुनगंटीवार यांच्या सूचना

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694


महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर, दि.२२:-
16 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्हातील आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे पडणारी घटना समोर आली होती. शेकडो रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या सीमा मेश्राम वय 29 वर्ष या परिचारिकेचा रात्रपाळीतील डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी मृत्यू झाला होता या घटनेनंतर जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये रोष करत परिचारिका संघटनांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील कार्यरत परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी समिती स्थापन करावी व इन कॅमेरा चौकशीची प्रणाली वापरावी तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, इतर कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची साक्ष नोंदवून घ्यावी, अशाही सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.


सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन सभागृहात आयोजित बैठकीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोयीसुविधा व इतर विषयांचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. सोनारकर, डॉ. प्रशांत उईके, महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशन चंद्रपूर शाखेच्या अध्यक्षा किरण वैरागडे आदींची उपस्थिती होती.
त्यावेळी त्यांनी परिचारिकेच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले. आपल्याच रुग्णालयात कार्यरत सीमा मेश्राम या परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यु होतो, ही रुग्णालय व्यवस्थापनासाठी अतिशय गंभीर बाब असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने या प्रकरणी कोणती चौकशी केली, चौकशी समितीचा निष्कर्ष काय काढला, असे सवालही त्यांनी प्रशासनाला विचारले. रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे असताना बहुतांश डॉक्टर ऑनकॉल असतात. ऑनकॉल असणारे डॉक्टर मुख्यालयी राहतात की बाहेरगावी. त्यांना रुग्णालयात राहणे आवश्यक वाटत नाही का, डॉक्टर्स आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात का, याचीही उत्तरे ना. मुनगंटीवार यांनी रुग्णालय प्रशासनाला मागितले.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता, सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता आदींना सोबत घेऊन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे निरीक्षण करावे. प्रत्येक बाबीची नोंद घेतली तर व्यवस्थेतील अभाव दूर करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
कसून तपास करा
रुग्णालयात डॉक्टरांची येण्याची आणि जाण्याची वेळ, त्यांची उपस्थिती आदी रेकॉर्ड सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासावा. तसेच डॉक्टरांच्या दैनंदिन स्वाक्षरी वहीची तपासणी करून हस्ताक्षर तज्ज्ञांकडून स्वाक्षरीबाबत खात्री करून घ्यावी. रुग्णालय प्रशासनाबद्दल तक्रार असल्यास नागरिकांसाठी तेथे तक्रार बॉक्स लावावा व त्याच्या चाव्या जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द कराव्यात. जेणेकरून तक्रारी गहाळ होणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले.
तक्रारींबाबत तात्काळ निर्देश
सायंकाळी पाचनंतर रुग्णालयात शवविच्छेदन केले जात नाही, सोनोग्राफीचे २० रुग्ण झाल्यानंतर इतर रुग्णांना परत पाठविण्यात येते, रुग्णांना छोट्या छोट्या बाबींकरीता डॉक्टर नागपूरला रेफर करतात, रुग्णालयात औषधी व इंजेक्शन न देता डॉक्टर बाहेरून लिहून देतात, सीटीस्कॅन रिपोर्ट मिळत नाही, डायलिसीस मशीन खराब आहे, स्टाफ नर्सची ३७५ पदे रिक्त आहेत, आदी बाबी नागरिकांनी ना. मुनगंटीवार यांच्या ध्यानात आणून दिल्या. ज्या डॉक्टरांची ड्यूटी आहे, ते उपस्थित न राहता दुसऱ्याच डॉक्टरांना पाठविण्यात येते, अशा तक्रारी काही नागरिकांनी केल्या. याबाबत अधिष्ठाता यांनी रोज कोणत्या डॉक्टरची ड्यूटी आहे, त्याचे नाव, मोबाईल क्रमांक, वेळ बोर्डवर लिहावे, असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले.
थेट वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना फोन
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निष्काळजीपणामुळे परिचारिकेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन केला. तसेच चंद्रपूर येथे येऊन जिल्हा सामान्य रुग्णालय भेट, नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी आणि रुग्णालय व्यवस्थापनाचा आढावा घेण्याची सूचना केली. ना. मुश्रीफ यांनी चंद्रपूर येथे येऊन आढावा घेणार असल्याचे सांगितले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…

16 hours ago

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

1 day ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 days ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

2 days ago