दरोडा टाकणाऱ्या टोळी मधील ०५ आरोपींना हत्यारासह जेरबंद करून ०३ देशी बनावटीचे कट्टे, ०६ राऊंड, ०१ लोखंडी कोयता, ०६ मोबाईल व ०२ दुचाकी असा ९७,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड शहर …

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा वरिष्ठा आदेशाप्रमाणे व सूचनाप्रमाणे मनोज खंडाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-५ पिं.चिं. यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल कोळी, पोहवा / ७१८ बनसुडे, पोहवा / ९७६ वहीस्ट, पोहवा / १००९ ठाकरे, पोशि/ १३०३ इघारे, पोशि/ १३०५ खेडकर, पोशि/ ४९९ माने, पोशि/ १८९८ गाडेकर, पोशि/२५७१ गुट्टे असे तळेगाव एमआयडीसी पो.स्टे. गु.र.नं. ३०९/२०२३ भादंवि क.३९२, ३४ मधील आरोपींचा शोध घेत असताना पो हवा / ७१८ बनसुडे व पोशि २२५२ निखणे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भंडारा डोंगराच्या पायथ्याला कमानीजवळ दडी गावाकडे जाणाऱ्या रोडला पाच इसन अंधारात संशयितरित्या थांबले असून त्याच्याकडे दोन दुचाकी आहेत. अशी खबर मिळताच लागलीच वपोनि मनोज खंडाळे सो यांनी मदतीसाठी तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन प्रभारी वपोनि रणजति सावंत यांचेकडे अधिकारी व स्टाफची मदत मागतिली असता त्यांनी सपोनि पांडे, पोउपनि अहिरे, पोहवा / ४७३ आंबेकर, पोहवा / ७१२ सोरटे, पोना / १०६७ सातकर, पोशि/२६८६ केंद्रे, पोशि/ ३०९१ माने, पोशि/ ३५३४ पगारे यांना मदतीस पाठविले. त्यांनतर वरील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी भंडारा डोंगराचे पायथ्याला सुदवडी गावाकले जाणारे रोडवर संशयतिरित्या थांबलेल्या ०५ इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव पत्ता १) निरज भिकमसिंग सेन, वय २१ वर्षे, सध्या रा. अनिता आशिष निर्मल यांचे भाड्याचे पत्र्याचे खोलीत तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे मुळ रा. बौरावती ता. शेहपुर जि धौलपुर राज्य राजस्थान २) योगेश सोरंग माहोर वय २० वर्षे, सध्या रा. अनिता आशिष निर्मल यांचे भाड्याचे पत्र्याचे खोलीत, तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे मुळ रा. आरुआ ता. बाडी जि. धौलपुर राज्य-राजस्थान ३) सुनील ओमीप्रकाश माहोर वय १९ वर्षे सध्या रा. अनिता आशिष निर्मल यांचे भावाचे पत्र्याचे खोलीत, तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे मुळ रा. मिठाकुर ता. मलपुरा जि. आग्रा राज्य उत्तर प्रदेश ४ ) श्यामसिंग मुन्नीलाल कोली वय ३५ वर्षे सध्या रा. अनिता आशिष निर्मल यांचे भाड्याचे पत्र्याचे खोलीत, तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे मुळ रा. अरुआ पोस्ट मरहोलीता. ता. बाडी जि. धौलपुर राज्य राजस्थान ५) एक विधीसंघर्षीत बालक असे सांगितले त्यांच्याकडे असलेल्या दुधाकी बाबत विचारणा केली असता ते उडवाउडदीची उत्तरे देवु लागले असता त्यांची आहे त्या परिस्थितीत पंचासमक्ष झडती घेतली असता १७,५००/- रु. एकूण येणे प्रमाणे ०३ देशी बनावटीचे कडे. ०६ राऊंड, ०१ लोखंडी कोयता, ०६ मोबाईल व ०२ दुचाकी मिळुन आलेने त्यावेकडे कसून चौकशी केली असता वरील सर्व आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांनी संगणमत करून त्यांचेकडील दुचाकी हिरो कंपनीची पेंशन दुचाकी क्र. MH14/DS/1970 व एक ओपो कंपनीचा मोबाईल माळवाडी ते वराळे रोडवर एका इसमास मारहाण करून चोरी केली असल्याचे सांगीतले. तरोध त्यांचेकडील दुसरी दुचाकी हिरो होंडा ग्लेंडक क्र. MHOG / R / 5628 ही सदरचा गुन्हा करतेवेळी वापरलेली आहे असे सांगितले. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनकडील अभिलेख चेक केला असता सदर हिरो कंपनीची पेंशन दुचाकी क्र. MH14 / DS / 1970 ही तळेगाव एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. २०९ / २०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४ मध्ये वरील आरोपींनी जबरदस्तीने चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीनी पिंपरी चिंचवड परिसरात आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबत अधिक तपास चालू आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे मा. सह. पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री. सतीश माने यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे मनोज खंडाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५, तसेच रणजति सावंत वपोनि तळेगाव एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल कोळी, पोहवा / ७१८ बनसुडे, पोहवा ९७६ बहीरट, पोहवा १००९ ठाकरे, मोहवा ८५८ राठोड, पोना १६०८ मालुसरे, पोना १९०० शेख, पोना १२९८ गोनटे पोशि १३०३ इधारे, पोशि १३०५ खेडकर, पोशि ४९९ माने, पोशि १८९८ गाडेकर, पोशि २५७१ गुट्टे, पोशि २२५२ निरवणे तसेच तळेगाव एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन कडील सपोनि पांडे, पोउपनि पंडीत आहिरे ( गुन्हे प्रगटीकरण तळेगाव एम. आय. डी. सी. पोस्टे), पोहवा / ४७३ आंबेकर, पोहवा / ७१२ सोरटे, पोना / १०६७ सातकर, पोना १६४७ काठे, पोशि/ २६८६ केंद्रे, पोशि २८२३ साठे, पोशि/ ३०९१ माने, पोशि/ ३५३४ पगारे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago