“पर्वती पोलीस स्टेशन कडून मोक्का कारवाई टोळी सदस्य संकेत देविदास लोंढे व त्याचे इतर ३ साक्षीदार यांचे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. २२/०७/२०२३ रोजी फिर्यादी हे रामकृष्ण मठाचे गेट शेजारी दांडेकर पुल पुणे येथून शतपावली करण्यासाठी पायी जात असताना आरोपी नामे संकेत देविदास लोंढे, प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे, अजित ऊर्फ आज्या संजय तायडे, शुभम दिगंबर गजधने असे फिर्यादी जवळ येवुन फिर्यादी यांना म्हणाले की, ” तू व आदीत्य खंडाळे यांनी माझ्या बहीणीला का छेडले” असे (विधिसंर्घषित बालक) म्हणाला तेव्हा फिर्यादी म्हणाला “मी तुझ्या बहीणीला ओळखत नाही.” असे म्हणाल्यावर याने फिर्यादीची कॉलर पकडून कानाखाली मारली व इतर संकेत देविदास लोंढे, प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे, अजित ऊर्फ आज्या संजय तायडे, शुभम दिगंबर गजधने यांनी सर्वांनी शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण सुरूवात केली. अभिजीत पाटील म्हणाला थांब तुला संपवुन टाकतो असे बोलून त्याच्या कंबरेतुन शर्टाच्या आत लपवुन ठेवलेला एक धारदार कोयता काढला व “भाई लोकांना शिवी देतो का तुला खल्लास करतो ल.…. असे म्हणुन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देश्याने फिर्यादी यांच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. परंतु फिर्यादीने तो चुकविला व हिसका मारून पळून गेला. (विधीसंघर्षीत) याने कोयत्याने वार करुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व फिर्यादी यांच्या वसाहतीमध्ये येऊन कोयता हवेत फिरवुन पोलीसात तक्रार दिली तर एक एकाचा मर्डर करुन टाकेन अशी धमकी देऊन परीसरात दहशत निर्माण केली. म्हणुन पर्वती पोलीस स्टेशन येथे पर्वती पोलीस स्टेशन गु.रं.नं. २१७ / २०२३ भा.दं.वि.क ३०७, ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ४(२५) म.पो.अधि. कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपासी अंमलदार सहा पोलीस निरीक्षक युवराज पाटील आहेत. दाखल गन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे संकेत देविदास लोंढेवय २० वर्षे, रा. गल्ली नं. १३, व्यास शॉपजवळ, जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे व त्याचे इतर ३ साक्षीदार १) प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे वय २० वर्षे, रा. स.नं. १२२, चुनाभट्टी, सिंहगड रोड, पुणे २) अजित ऊर्फ आज्या संजय तायडे वय २० वर्षे, रा. गल्ली नं.६, साई मंदिराजवळ, जनता वसाहत, पुणे ३) शुभंम दिगंबर गजधने वय १९ वर्षे, रा. स.नं. १३४, परिवर्तन बिल्डींग, दांडेकर पुल पुणे (टोळी सदस्य) यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने यातील आरोपी नामे संकेत देविदास लोंढे वय २० वर्षे याला दि. ०९/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी नामे १) प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे वय २० वर्षे, २) अजित ऊर्फ आज्या संजय तायडे वय २० वर्षे, ३) शुभंम दिगंबर गजघने वय १९ वर्षे यांना दि. २४/०७/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.वरील नमुद आरोपींकडे सखोल तपास केला असता वर नमुद आरोपींचे पूर्व रेकॉर्डची पाहणी करता यातील आरोपी नामे संकेत देविदास लोंढे (टोळी सदस्य) याचे विरुध्द ६ गुन्हे असुन त्याने आरोपी नामे प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे, अजित ऊर्फ आज्या संजय तायडे, शुभम दिगंबर गजधने यांचे सह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असुन सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य कराणारा गट संकेत लोंढे याने तयार केला असून वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.सदर टोळीने मागील १० वर्षात खूनाचा प्रयत्न, दुखापत किंवा हमला इत्यादी करण्याची धमकी देवून किंवा हमला इत्यादी करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण, बेकायदेशीर जमाव जमवणे, दुखापत, बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणणे इत्यादीची धमकी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जीवीतास धोका निर्माण करण्याचे उद्देशाने दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने चालू ठेवल्याचे निषन्न होत आहे.

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( ४ ) प्रमाणे कलम वाढविण्यासाठी सदर कायद्याचे कलम २३ (१) अ अन्वये मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव श्री. जयराम पायगुडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन पुणे यांनी मा पोलीस उपआयुक्त साो. परिमंडळ ३ पुणे शहर श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील यांना सादर केला होता…सदर प्रकरणी छाननी करून पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं. २१७ /२०२३ भा.दं.वि.क ३०७, ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ४(२५) म.पो.अधि. कलम ३७ (१) सह १३५ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( ४ ) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.. प्रविणकुमार पाटील यांनी पुर्व मान्यता दिलेली आहे.

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. उपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त साो. परिमंडळ – ०३ सुहेल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड, पुणे शहर श्री. अप्पासाहेब शेवाळे, यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठपोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, पोलीस अंमलदार दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरिराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (४) प्रमाणे .वी कारवाई आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

19 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

21 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago