चंद्रपूर जिल्हात पेटत्या चितेचा फोटो ठेवत उच्च शिक्षित तरुणाने केली आत्महत्या, सर्वत्र हळहळ.

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील सिंदेवाहीत तालुक्यातून एक समाजमन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका 30 वर्षीय युवकाने आपल्या मोबाईल फोनच्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर जळणाऱ्या चितेचा फोटो ठेवला. यानंतर गावातील सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिंदेवाहीत तालुक्यातील रत्नापूर येथे मंगळवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास दिनेश भालचंद्र चावरे या तरुणाने गावातील सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मृतक दिनेश चावरे हा उच्च शिक्षित होता. 2020 मध्ये कृषी विभागात कृषिसेवक पदासाठी निवड झाली होती. त्याला निवड झाल्याचे पत्रही मिळाले होते. त्याच सुमारास त्याला ऑस्टिओमायलिटिस नावाचा दुर्धर आजार झाला. या आजाराने त्याचा जीव जावू नये, म्हणून डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्याचा पाय कापावा लागत होता. त्याचा एक पाय कंबरेपासून पूर्णपणे कापला गेला. दोन पायाने धडपडणाऱ्या दिनेशला कुबड्या लागल्या. या आजाराने त्याला असह्य वेदना व्हायच्या. आई- वडिलांनाही हे बघवत नव्हते. या आजारातून मुक्तता व्हावी, म्हणून उपचारावर सुमारे पंधरा लाख रुपये खर्च झाला; परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही यश आले नाही.

घरची परिस्थिती, होणारा खर्च, सततच्या असह्य वेदनेला दिनेश कंटाळला होता. दिनेशने मंगळवारी 6.23 मिनिटाला आपल्या व्हाॅट्सॲपवर जळत्या चितेचा फोटो अपलोड केला आणि त्याखाली याच्यासाठी, त्याच्यासाठी, नुसताच पळत होता. सगळेच गेले घरी निघून हा एकटाच जळत होता, असा भावनिक संदेश लिहिला. त्याचा अखेरचा हा संदेश कुणालाही कळला नाही. त्याच रात्री 12 वाजेच्या सुमारास गावातीलच सार्वजनिक विहिरीमध्ये दिनेशने उडी घेऊन जीवनाशी सुरू असलेला संघर्ष कायम संपवला.

ही घटना उघड होताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्याच्या मृत्यूपश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. बुधवारी दुपारी रत्नापूर येथील स्मशानभूमीत दिनेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. होतकरू तरुण मुलाने आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

17 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

18 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago