✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथील एका तरुणीची ऑनलाईन फसणवूक करण्यात आल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी आरोपीला वर्धा सायबर पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या आहे. याबाबतचा पुढील तपास वर्धा पोलिस करत आहेत.
चित्रीका सुभदर्शनी सुधांशु पानीग्रही वय 28 वर्ष व्यवसाय- सिनी. लेक्चरर, रा. रावत रेसीडंन्सी, सावंगी, मेघे यांना आरोपी मो.क्र. धारकाने फेडेक्स नावाचे कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून त्यांचे नावाचे पार्सल मध्ये 02 किलो कपडा, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट कार्ड व 140 ग्रॅम एम.डी हे अंमली पदार्थ पकडले असल्याचे सांगितले. त्याकरीता 16,250 रूपये त्यांच्या आय.डी वरून पाठविले असे सांगुन मुंबई पोलिस सायबर क्राईम या नावाने स्काईप वरून कॉल करून भिती दाखवली आणि 2,47,776 रुपये ऑनलाईन वळते करण्यास भाग पाडून फसवणुक केली. अशा फिर्यादींचे लेखी तक्रारीवरून सायबर पोलिस स्टेशन, वर्धा येथे 27 जून रोजी अप क्र 01/23 कलम 419, 420 भादवि. सह कलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यानंतर या गुन्हयाचा तांत्रीक पध्दतीने तपास करून गुन्हयात आरोपी अंबादास जनार्धन कांबळे, रा. नांदेड व अनिल संभाजी पाटील रा. औरंगाबाद यांना 18 ऑगस्ट रोजी गुन्हयात अटक करण्यात आली होती. सदर गुन्हयाचे पुढील तपासात तांत्रीक विश्लेषनावरुन प्राप्त माहितीचे आधारे गुन्हयाचे तपास कामी पथक सुरत (गुजरात) येथे रवाना करण्यात आले होते. सदर ठिकाणी तपास करून गुन्हयात आरोपी 1) अजय दत्तु पाटील, रा. सुरत, (गुजरात) 2) पृथ्वीश शिवाभाई मावाणी, वय 21, रा. सुरत (गुजरात) यांना दि. 26 ऑगस्ट रोजी गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
यावेळी आरोपीच्या ताब्यातून 05 मोबाइल व इतर याप्रमाणे एकूण 80,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींची 30 ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड प्राप्त असून, गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे. गुन्हयात आणखी आरोपी पुढे येण्याची शक्यता आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…