मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाची दिनांक 22 जून 2015 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे. त्या अनुषंगाने कब – बुलबुल, स्काऊट आणि गाईडचे पथक शाळेमध्ये सुरू असणे ही आज काळाची गरज ठरलेली आहे. शील, आरोग्य, स्वावलंबन, सेवा या चार सूत्रावर आधारलेले स्काऊट गाईड शिक्षण आहे. स्काऊट गाईड उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर उत्तम नागरिकांचे संस्कार घडत असते. म्हणूनच महाराष्ट्र राज्य तथा संचालक विद्या प्राधिकरण पुणे यांनी कब – बुलबुल, स्काऊट – गाईड तासिकेबाबत नमूद केले आहे. याच धर्तीवर जी.बी.एम.एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे डॉ . मंगेश घोगरे, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा तथा जिल्हा मुख्य आयुक्त स्काऊट आणि गाईड कार्यालय वर्धा श्री सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा जिल्हा आयुक्त स्काऊट, यांच्या प्रेरणेने, वर्धा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा वर्धा द्वारा स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन आणि नवीन शिक्षक शिक्षिकांकरिता स्काऊट गाईड विषयाची माहिती देण्याकरिता उद्बोधन व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वर्धा भारत स्काऊट गाईड, जिल्हा वर्धा च्या जिल्हा संघटक श्रीमती वैशाली अवथळे मॅडम यांनी उद्बोधन सत्राला उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना आजच्या बदलत्या काळामध्ये विद्यार्थ्यांकरीता स्काऊट गाईडची भूमिका कशी महत्त्वाची ठरते याविषयी मार्गदर्शन केले. किरण जंगले सर, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट, उर्मिला चौधरी मॅडम, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड, श्री राजहंस जंगले सर, सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट. यांनी स्काऊट गाईड अंतर्गत परीक्षा, पुरस्कार, वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेमधील गीते, तसेच शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी विविध अनुभव कथन करून, प्रशिक्षणार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला जी.बी.एम.एम. विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री फुटाणे सर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्याकरिता स्काऊट गाईड फार मोठी भूमिका पार पाडत असते, असे मत प्रतिपादन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीते करिता गटशिक्षणाधिकारी अल्का सोनवाणे, श्री कोडापे, श्री टाकळे, श्री राठोड विस्तार अधिकारी शिक्षण यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार प्रदर्शन फ्लॉक लीडर संगीता पेठे (गडवार), विषय साधन व्यक्ती, पंचायत समिती हिंगणघाट, यांनी केले. प्रशिक्षणाच्या आयोजनामध्ये स्काऊट मास्टर श्री काटेखाये सर, जी.बी.एम.एम हायस्कूल हिंगणघाट व विद्यानंद कोमलवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…