अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मोहाडी:- तालुक्यातील मोहगाव देवी येथे अनुभव शिक्षा केंद्र भंडारा अंतर्गत दोन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये भंडारा जिल्ह्यातील खुटसावरी, पलाडी, मटोरा, भंडारा, टेकेपार डोड, माडगी , कवलेवाडा, अजिमाबाद विविध गावातील विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला होता.
आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमध्ये युवकांच्या विकास कशाप्रकारे होईल यावर भर देण्यात आले त्यामध्ये पहिल्या दिवशी कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, जे जे ॲक्ट, महिलांचे हक्क व अधिकार याबाबत सरिताताई रहांगडाले यांनी मार्गदर्शन केले तसेच संविधानाची प्रास्ताविका समजून सांगण्यासाठी अनुभव शिक्षा केंद्राचे स्वयंसेवक आकाश यांनी विद्यार्थ्यांना धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय अशा मूल्यांची ओळख करून दिली. तसेच रात्री अनुभव शिक्षा केंद्र मित्र, साथी आणि मोहगाव देवी येथील मुलांचे सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयावर नाटक व डान्स करण्यात आलं.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी करिष्मा मुनेश्वर अनुभव शिक्षा केंद्र वर्धा प्रशिक्षका यांनी अनुभव शिक्षा केंद्राची मूल्य ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून समजून सांगितले त्यानंतर राजकारणातील युवांच्या सहभाग एक नवी दिशा प्रा. आंबिलकर सर यांनी मुलांना गमतीच्या माध्यमातून राजकारणाची रूपरेषा व राजकारण कसं चालतं आणि राजकारणात सक्षम नेतृत्व यावं यासाठी सरांनी मार्गदर्शन केले त्यानंतर गावातील मारबते सर तंटामुक्ती अध्यक्ष वसंताजी लांबट , श्री माननीय नागपुरे सर उपाध्यक्ष, अजयजी बाळबुदे, सरपंच राजेशजी लेंडे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी विद्यार्थ्यांचे मनोगत घेण्यात आले आणि या दोन दिवसात त्यांना कसे वाटले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौतुक मेश्राम अनुभव शिक्षा केंद्र साथी, आयोजक विपिन कुमार लेंडे, आकाश रामटेके, धम्मदीप मेश्राम, सत्यपाल तितीरमारे, करिश्मा आतीलकर, तसेच सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…