मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील विद्या विकास शिक्षण संस्थेचे सचिव , माजी नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक डॉ उमेश तुळसकर तसेच माजी नगरसेवक देवेंद्र पडोळे, माजी नगरसेविका प्रतिभा पडोळे सहित अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेने ठाकरे ला जय महाराष्ट्र केले. यासर्वांनी वर्धा जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापुरकर यांच्याकडे प्राथमिक सदस्यपदाचा व पदाचा राजीनामा सोपविला. यामुळे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून हादरा बसला आहे.
वर्षभरापूर्वी डॉक्टर तुळसकर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. तसेच पडोळे दाम्पत्यांनी सुद्धा वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश घेतला होता. परंतु अल्पावधीतच पक्ष नेतृत्वाकडून त्यांचा भ्रमनिराश झाल्याने शिवसेना सोडत असल्याचे सांगितले. जिल्हा समन्वयक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात डॉक्टर तुळसकर यांनी पक्ष बांधणी करता अथक परिश्रम घेतले. माजी आमदार अशोक शिंदे यांनी पक्ष सोडल्यानंतर तुळसकर यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केला. परंतु या कार्याची दखल कुठल्याही प्रकारे वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली नाही.
या विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या मांडण्याकरीता मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु एकदा ही त्यांची भेट मिळाली नाही व पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु त्यांनी सुद्धा कुठल्याही स्वरूपाची दाखल घेतली नाही. त्यामुळे या मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. परिणामी डॉक्टर तुळसकर यांचे सहीत त्यांच्या अनेक समर्थक शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. सेनेचा राजीनामा दिल्या नंतर सध्या तरी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…