पुण्यात पोलीस शिपायाने केला चक्क 55 वर्षीय महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग.

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. शहरात कार्यरत असलेल्या एका 55 वर्षीय महिला पोलिस निरिक्षक असलेल्या महिलेचा मुंबईतील फोर्स वन पथकात कार्यरत असणाऱ्या एका 34 वर्षीय पोलिस शिपायाने विनयभंग केल्याची घटना सिंहगड रोडवरील अभिरुची पोलिस चौकीत घडली आहे.

याप्रकरणी महिला पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून निलेश आंद्रेस भालेराव रा. कोले कल्याण, पोलिस वसाहन बिल्डींग १, रुम नं. ४०४, सांताक्रुझ, मुंबई याच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पोलिस निरीक्षक या 2018 साली पुण्यातील एमआयए येथे नेमणुकीस होत्या. त्यावेळी आरोपी निलेश भालेराव हा फोर्स वनच्या ट्रेनिंगसाठी एमआयए येथे आला होता. त्यावेळी त्याने संबंधित महिला अधिकाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांचा विनयभंग केला होता.

या प्रकरानंतर तक्रारदार महिला उपनिरीक्षकांनी त्याच्याविरोधात वानवडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर निलेश भालेरावच्या कुटुंबियांनी केलेल्या विनंतीवरून तो गुन्हा मागे घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही निलेश भालेराव सतत महिला अधिकाऱ्याच्या मोबाइलवर फोन करून त्यांना त्रास देत होता. त्यामुळे याबाबतची अदखलपात्र स्वरूपाची तक्रार त्यांनी अभिरुची पोलिस चौकी येथे केली होती.

ही तक्रार करून तक्रारदार महिला अधिकारी त्यांच्या पतीसोबत घरी जात असताना, निलेश भालेरावने ‘हे काही बरोबर केले नाही, माझा त्रास तुम्ही आणखीन वाढवला’ असे मोठ्याने बोलला. तसेच तक्रारदार महिला या अभिरूची चौकीतून बाहेर पडत असताना, त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना तेथे असलणाऱ्या पायऱ्यांवर ढकलून त्यांच्या शरीराला वाईट हेतूने स्पर्श करत शिवीगाळ केली. याप्रकरणाचा पुढील तपास सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंदनशिव करत आहेत.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…

17 hours ago

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

1 day ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 days ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

2 days ago