मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
गडचिरोली:- जील्हातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. चामोर्शी तालुक्यातल्या विक्रमपूर येथील सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओलालवार वय 46 वर्ष याला लाचेचा भस्म्या रोग जळला होता. तोच त्याला नडला.
विक्रमपूर येथे सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओलालवार त्यांनी नवग्राम येथील तक्रारदारा कडून घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता 10 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती 9 हजार रुपयांची लाच देण्याचं ठरल.
आपण निवडून दिलेला जनप्रतिनिधीच आपल्याला लाचेची मागणी करतो त्यामुळे तक्रारदार या भष्ट्र सरपंचाला लाच द्यायची इच्छा नव्हती त्यामुळे त्याने लाचलुत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. ठरलेल्या नुसार 9 हजार रुपयाची लाच स्वीकारताना भष्ट्र लाचखोर सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओलालवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात फसला. त्याला पोलिसांनी बेळ्या ठोकल्या आहे. पुढील कारवाई सुरू असून चोकशी अंती अजुन काही खळबळजनक माहिती समोर येऊ शकते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर, मधुकर गीते, अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात सुरेंद्र गरड पोलीस उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार दत्तू धोटे, नापोशी राजेश पतंग गिरवा, नापोशी श्रीनिवास संगोजी, नापोशी किशोर ठाकूर, पो.शी. संदीप उडाल, म.पो.शी जोत्सना वसाके, चालक पोहवा तुळशीराम नवघरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…