उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन शिरोळ:- वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका कार्यकारणीच्या वतीने नांदणी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा किरण मंगल कार्यालय नांदणी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी नांदणी ग्राम शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिरोळ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे वाढता आलेख पाहता शिरोळ तालुक्यात अनेक नेते व पुढाऱ्यांना राजकीय पक्षांना धडकी भरवण्याचे काम शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीने या मेळाव्याच्या माध्यमातून केले आहे.
या मेळाव्याचे अध्यक्षपद कोल्हापूर जिल्हा पक्ष निरीक्षक अतुल बहुले यांना देण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना अतुल बहुले यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे नियम व शिस्त, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे पक्ष बाबतीत ध्येयधोरणे, तसेच इंडिया आघाडी मध्ये प्रकाश आंबेडकर यांना सामावून न घेण्या बाबत कसे षडयंत्र चालू आहे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद सनदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सध्या देशात भारत व इंडिया यावरून होत असलेला वाद, तसेच हिंदुत्व वादावरून तसेच देशात जातिवादावरून देशात दंगली घडवण्याची षडयंत्र सुरू आहे याबद्दल माहिती दिली यानंतर पुढील मार्गदर्शन विश्वजित कांबळे महाराष्ट्र प्रदेश कमिटी सदस्य. तसेच सर्जेराव फुले, भक्ती शिंदे मॅडम, जिल्ह्याचे महासचिव सिद्धार्थ कांबळे, कुरुंदवाड बार असोसिशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते एडवोकेट ममतेश आवळे, डॉ.विश्वनाथ पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय खातेदार, यासह वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष वासंती ताई मेहतर यांनी महिला सक्षमीकरण तसेच पक्षातील महिला आघाडी वाढवण्या संदर्भात मार्गदर्शन केले.
या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष बबन कांबळे,युवा आघाडी तालुका अध्यक्ष महेंद्र कांबळे, समता सैनिक दल तालुकाप्रमुख अमित कांबळे कामगार आघाडीचे राजू कांबळे ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय सुतार, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे, युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव तांबे युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे, शिरदवाड गावचे उपसरपंच अर्जुन कांबळे, एडवोकेट बुद्धभूषण कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते धनपाल कांबळे, लालासो पठाण व बिरू वाटारे हे प्रमुख उपस्थित होते, या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना दुपारचे भोजनदान पांडुरंग गायकवाड पूरग्रस्त सेवा संस्थान प्रमुख यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजक शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, शिरोळ तालुका उपाध्यक्ष छोटू पटेल, तालुका उपाध्यक्ष रमेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष जी.डी धनावडे, तालुका महासचिव विश्वास शिंगे, तालुका महासचिव किरण कांबळे, तालुका महासचिव अण्णासाहेब कांबळे, तालुका संघटक निखिल कांबळे, तालुका संघटक गौतम कांबळे, तालुका कोषाध्यक्ष बिरू कांबळे, तालुका सहकोषाध्यक्ष आकाश हेगरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख अक्षय कांबळे, तालुका सचिव संदीप कांबळे, तालुका सहसचिव अतिक पटेल वंचित कार्यकर्ते इरफान चौगुले, सुलतान पटेल, इम्तियाज पटेल, सदर मेळाव्याचे आयोजक नांदणी शाखेचे सचिन माळी, यल्लाप्पा नाईक गोपीचंद गवळी, पप्पू तगारे, विश्रांत कांबळे, सुरेश तगारे, अजित भाबुजे, मनोहर तगारें, सागर तगारे, लखन कांबळे, यासह भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन कामगार आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल या सर्व संघटनाचे आजी-माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…