नदीच्या पुरात संसार वाहून गेल्याने हतबल झालेल्या नागरिकांनी नाशिक- पुणे महामार्गावर आंदोलन.


✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी✒️

नाशिक/सिन्नर:- या वर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक नदी नाल्याला पूर आला. त्यात सिन्नर येथील सरस्वती नदीच्या पुरात संसार वाहून गेल्याने हतबल झालेल्या नागरिकांनी नाशिक- पुणे महामार्गावर आंदोलन केले असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

स्थानिक रहिवाशांची साधी विचारपूसही केली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी अथवा नगरपालिका प्रशासन यांनी तत्काळ दखल घेऊन मदत करावी अशी मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्यासह काही कार्यकर्ते मनधरणी करत आहेत. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आमच्यावर बेतलेला प्रसंग कठीण असून याची साधी दखल कोणी घेत नसेल तर ही परिस्थिती चांगली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे आंदोलनस्थळी दाखल झाले असून ते आंदोलनकर्ते यांची समजूत काढत आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

8 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

19 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

19 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

19 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

19 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

20 hours ago