✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :- 2018 साली संपर्ण नाशिक जिल्हाला खळबळ उडवनारी घटना समोर आली होती. एका इसमाने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून एका तरुणाचा खून केला होता. तरुणाच्या खून करणार्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी शुक्रवारी दि.2 जन्मेठप व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कुणाल किशोर हरकरे 28, रा. भजनी मठाजवळ, इगतपुरी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
इगतपुरीतील कोकणी मोहल्ला येथे 23 सप्टेंबर 2018 रोजी दीपक खंडू बोरसे, प्रशांत ऊर्फ लखन खंडू बोरसे हे गणपती विसर्जनाची तयारी करत होते. त्याचवेळी कुणाल हरकरे याने खुन्नसने बघत असल्याच्या रागातून बोरसे बंधूंसोबत वाद घातला. स्थानिकांनी हा वाद मिटविल्यानंतर गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री बोरसे बंधू व सुरेश प्रभूदयाल गुप्ता ऊर्फ बबलीशेठ हे गल्लीत गप्पा मारत असताना संशयित हरकरे याने दुपारच्या भांडणाचा राग मनात धरून लखन बोरसेवर पेट्रोल टाकून पेटता बोळा त्याच्या अंगावर फेकला. दीपक व बबलीशेठ यांच्याही अंगावर पेट्रोल उडाल्याने तसेच लखनची आग विझविताना दोघेही भाजले.
गंभीर जखमी झालेल्या प्रशांत बोरसे याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी तपासाची चक्रे फिरवित हरकरे विरोधात सबळ पुरावे जमा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश आर. आर. राठी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून हरकरेला जन्मठेप व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. योगेश कापसे यांनी काम पाहिले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…