सोन्याचे दागिने जबरीने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व कट रचणाऱ्या सोनारासह 5 आरोपीला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- सोन्याचे दागिने जबरीने चोरण्याचा प्रयत्न तसेच जबरी चोरीचा कट रचनाऱ्या सोनार व त्याच्या ०४ साथीधारांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे घटना शुक्रवार (ता.८) रोजी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास एम्पायर स्टेट येथील उड्डाणपुलावरून काळेवाडी येथे घडली आहे.

यात आरोपी किशोर सुरेश भिसे वय २२ वर्षे, रा. घरकुल चिखली २) शमशद रजब अली शहा वय २० वर्षे, हरगुडे वस्ती चिखली ३) अभिराज जोखराम कोरी वय २८ वर्षे, रा.हरगुडे वस्ती चिखली ४) मुस्ताफा गणेश उर्फ असलम शेख वय २३ वर्षे, रा.हरगुडे वस्ती चिखली ५) सोनार सुनील बाळकृष्ण वाडेकर वय ४५ वर्ष, रा. होळकर चाळीत भाड्याने, पाण्याच्या टाकीजवळ आळंदी, ता. खेड, जि. पुणे अशी अटक केल्याची नावे आहेत.

याप्रकरणी मुकेश कुमार जीवा राम लोहार रा. नेहरूनगर, पिंपरी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मुकेश लोहार हे नेहरूनगर पिंपरी येथील उमेश जैन यांच्या मालकीच्या श्री अंबिका ज्वेलर्स यांच्याकडे नोकरीस आहे. उमेश जैन हे सोन्याचे होलसेल व्यापारी आहेत, छोट्या दुकानदारांनी केलेल्या मागणीप्रमाणे ते त्यांना सोन्याचे दागिने पुरवणयाचे काम करतात. फिर्यादी जीवाराम लोहार आणि त्याचा सहकारी खुलाराम परिहार दोघे पिंपरी चिंचवड शहरातील सोनारांना मागणीप्रमाणे सोन्याचे दागिने देण्याचे काम करतात.

शुक्रवार दिनांक ८ रोजी हे दोघांनी दुपारी दुचाकी वरून थेरगाव १६ नंबर येतील नारायण ज्वेलर्स या दुकानाला भेट दिली आणि पुन्हा नेहरूनगर पिंपरी कडे निघाले. काळेवाडी फाटयाच्या अलीकडे एका निळ्या रंगाच्या स्प्लेंडर गाडीवरील दोन अनोळखी इसमानी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथे गर्दी असल्याने त्यांना थांबविता आले नाही. मात्र पुढे या इस्मानी एम्पायर स्टेट येतील उडान पुलावर यांना दुचाकी आडवी घातली आणि त्यांच्याकडे ८०० ग्राम सोनेअसलेले सॅक जबरीने घेण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु या अनोळखी समाजाची दुचाकी घसरल्याने त्यांचा प्रयत्न फसला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेच्या आधारे या इसमांची ओळख पटवून त्यांना व त्याच्या दोन साथीदार ना चिखली च परिसरातून अटक केली. अटक केलेल्या इसमाकडे पोलिसांनी अधिक सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली सुनील बाळकृष्ण वाडेकर या सोनारणे या ८०० ग्राम सोन्याबाबत संपूर्ण माहिती देऊन कट रचला असल्याचे अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले पोलिसांनी या सोनारला भोसरी येथून अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे, सहाय्य पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक फौजदार राजेंद्र काळे, हवलदार वंदू गिरे ,संदीप गवारी, अतिश जाधव, पोलीस नाईक अतिक शेख प्रशांत गिलबिने, पोलीस शिपाई भास्कर भारती ,सौदागर लामतुरे स्वप्निल लोखंडे यांच्या या पथकाने ही कारवाई केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

20 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago