पुण्यात येरवडा परिसरात धारदार शस्त्राने वार करुन जबरदस्तीने पैसे लुटले, पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या.

नरेंद्र नायडू पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन पुणे:- शहरातील येरवडा परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. धारदार शस्त्राने वार करुन जबरदस्तीने 90 हजार रुपये लुटण्यात आले. त्यानंतर आरोपी घटना स्थळावरून पळून गेले. या आरोपींना येरवडा पोलिसांनी अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 14 सप्टेंबर रोजी येरवडा परिसरातील चिमाघाट येथील ब्रिजखाली घडली होती.

आरोपी आकाश हनुमंत भंडारी उर्फ दशरथ वय 23 वर्ष रा. वडारवस्ती, येरवडा, अनुज सोमनाथ जोगदंड वय 19 वर्ष रा. ताडीगुत्ता, येरवडा, योगेश दिलीप नवघणे वय 30 वर्ष रा. गोकुळ नगर, कोंढवा, सलमान फारुख कुरेशी वय 23 वर्ष रा. शनी अळी, येरवडा, शिवकुमार संजय शेलार वय 22 वर्ष रा. भाडी मंडई, येरवडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मुकेश सपकाळ यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 394, 395, 397, 120 (ब), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या दिवशी फिर्यादी मुकेश सपकाळ हे त्यांच्या मित्रासह चिमाघाट येथील ब्रिज खाली बसले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन खिशातील 90 हजार रुपये काढून घेऊन पळून गेले होते. पोलिसांनी आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल परदेशी, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे यांना माहिती मिळाली, दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी येरवडा येथे येणार आहेत. पोलिसांनी आरोपींना शिताफीने पकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पर्णकुटी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव, जयदिप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, अजित वाघुले यांच्या पथकाने केली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

5 mins ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

20 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago