आकाशाला गवसनी घालणारे हात ग्रामीण भागातील शिक्षणातूनच उदयास आले: माजी मंत्री सुनील केदार
देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आज आपला देश प्रत्येक क्षेत्रात जगाशी स्पर्धा करतोय हे फक्त आणि फक्त शिक्षकांमुळेच शक्य आहे. आज जे हात आकाशाला गवसनी घालतायेत ते हात ग्रामीण भागातील शिक्षणातूनच उदयास आले असे आपण म्हणू शकतो. असे यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूरच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री सुनील केदार म्हणाले पुढे बोलताना केदार यांनी शिक्षण क्षेत्रात काळानुरूप बदलाची गरज असून शिक्षण क्षेत्रात मोठ्या संशोधनात्मक प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून ज्या गतीने शिक्षण क्षेत्राचा पाया मजबूत केला गेला ती गती आज मात्र संत झाल्याचे दिसून येते अशा शब्दात केदार यांनी खंत व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूर तर्फे नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे यशवंत आदर्श शिक्षक पुरस्कार माजी मंत्री सुनील केदार च्या हस्ते वनराई फाउंडेशनचे डॉ गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी बोलताना माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी जुन्या काळातील गुरुजी आणि त्यांच्या शालेय जीवनातील आठवनींना उजाळा देऊन सध्या शिस्त व अनुशासन कमी होत असल्याची खंत व्यक्त केली तर अध्यक्षीय स्थानावरून बोलताना गिरीश गांधी यांनी शिक्षकाने शिक्षक म्हणूनच जगले पाहिजे यावर विस्तृत भाष्य केले. यावेळी महेश बंग, राजाभाऊ टाकसाळे, कोमल देशमुख, रवींद्र देशमुख, डॉ. अभय महांकाळ,डॉ. मंजुषा सावरकर, उल्लास मोगलेवार. निलेश खांडेकर, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, जि प सदस्या रश्मी कोटगुले, प.स सभापती सुषमा कावळे, उपसभापती उमेश राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, उपसभापती योगेश सातपुते प.स सदस्य सुनील बोंदाडे, अनुसया सोनवाने, आकाश रंगारी, राजेंद्र उईके, पप्पूजी जयस्वाल , सुरेंद्र मोरे, संतोष नरवाडे, प्रदीप कोटगुले, सुधाकर धामंदे, विनय तापडिया, विनोद चतुर्वेदि, हेमंत शर्मा, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर जिल्हा केंद्राचे अध्यक्ष महेश बंग यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कोमल ठाकरे तर आभार राजाभाऊ टाकसांडे यांनी मानले.
यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये काटोल तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलागोंदी येथील राजेंद्र रामहरी टेकाडे, नरखेड तालुक्यातून जीवन विकास विद्यालय देवराम येथील मदन विष्णूजी ढोले, सावनेर तालुक्यातून भनसाळी बुनियादी विद्यामंदिर टाकळी येथील पंकज रामकृष्ण चारथळ, कळमेश्वर तालुक्यातून नगरपरिषद माध्यमिक विद्यालच्या पौर्णिमा आनंदराव मेश्राम, हिंगणा तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवा (मारवाडी) येथील नंदकिशोर चिरकुट आंबुलकर, पारशिवनी तालुक्यातून केसरी लाल पालीवाल विद्यालयातील विकास शामराव ढोबळे, रामटेक तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काथियाटोला येथील प्रेसेनजीत गजानन गायकवाड, मौदा तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिपरी (धानला )येथील गजानन काशीराम बेले, कुही तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पचखेडी येथील संजय बाबुराव पेशने, उमरेड तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडध येथील दिगंबर माणिकराव ठाकरे, कामठी तालुक्यातून तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील शारदा कृष्णकांत रोशनखेडे तर नागपूर शहरातील राजेंद्र हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय महाल येथील स्मिता विवेक नाहातकर यांना पाच हजार रुपये रोख, शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा यशवंत आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. तर सर्व सहभागी शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…