जोसेफ नदेसन पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातील देहुरोड येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पांना घरी आणताना साडी नेसण्यासाठी मुलीने आईकडे हट्ट धरला मात्र आईने मुलीला साडी नेसवण्यासाठी नकार दिला. या रागातून मुलीने चक्क गळफास घेत आत्महत्या केली त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ही मन हेलावणारी घटना मंगळवारी दि. 19 दुपारच्या सुमारास दत्तनगर, किवळे देहुरोड येथे घडली. सुश्मिता पिंटू प्रधान वय 13 वर्ष असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुश्मिता, तिची मोठी बहीण आणि लहान भाऊ असे तिघेजण लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करीत होते. गणेशाच्या आगमनाची सुष्मिताला मोठी उत्सुकता होती. त्यासाठी तिने सकाळीच आईकडे साडी नेसण्याचा हट्ट केला होता. साडी नेसून नटून थाटून तिला बाप्पांचे स्वागत करायचे होते. मात्र, एवढ्या सकाळी साडी नेसवण्यास आईने विरोध केला. त्यामुळे सुश्मिता नाराज झाली होती.दरम्यान, दुपारी सुश्मिताची मावशी आणि काका घरी आले होते. त्यावेळी देखील सुश्मिताने साडी नेसण्याच्या आग्रह केला. एका विशिष्ट पद्धतीची साडी नेसण्यासाठी तिने हट्टच धरला. त्यावेळी कुटुंबीयांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुश्मिता चिडून बाथरूममध्ये गेली. बराच वेळ सुश्मिता बाहेर न आल्याने तिच्या मोठ्या बहिणीने बाथरूमचे दार ठोठावले. मात्र, सुश्मिताने आतून काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने बाहेर जाऊन खिडकीतून डोकावून पाहिले. त्यावेळी तिला सुश्मिता लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडून सुश्मिताला खाली उतरवून तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी सुश्मिताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…