अक्षय जाधव सातारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- गेल्या दोन चार वर्षे वाई तालुक्यात सर्वच गावांमध्ये पाऊस तुफान कोसळला.. यंदा मात्र पाऊस पडत नसल्याने अगदी ऐन वेळी गरज असताना तो पडत नाही. सोयाबीन, भुईमूग, हळद, ऊस, भात व इतर पिकांना पावसाळ्यात पाणी नसल्याने ही उभी पिके आज पाण्यावाचून करपून गेली आहे…
त्यामुळे खरंतर पावसाचा भाग असलेल्या या ठिकाणी शेतकरी वर्गासह सर्वत्रच चिंतेचे वातावरण पसरले आहे. सर्वच पिकं मान टाकू लागली आहेत. त्यांची उत्पादन क्षमता कमी होण्याची भीतीही आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात पैसा येणार नाही. उलट जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणी चाऱ्याचा प्रश्न अतीशय गंभीर बनला आहे.
सर्वच बाजूंनी असलेल्या आशा संपुष्टात येऊ लागल्याने जुन्या रुढी परंपरा व प्रथेप्रमाणे शेवटी देवाचा धावा करणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांना दिसू लागल्याने बालेघरच्या डोंगरकुशीत वसलेल्या चांदक या गावात ग्रामस्थ एकत्रित आले. आपल्या ग्रामदेवतेला तुझी प्रजा वाचव असे गाऱ्हाणे मांडले. ढोल ताशांच्या गजरात हर हर महादेव अशी गर्जना करत श्री चंद्रेश्वर (महादेव) देवाला साकडे घालून गावावर आलेले संकट दूर कर व पाऊस पडू दे अशी प्रार्थना केली.
पूर्वीच्या काळी दुष्काळ पडला की, महादेव मंदिरातील पिंड आणि गाभारा दुध व पाण्याने पूर्ण भरायची व महादेव कोंडायचा अशी प्रथा होती. महादेव कोंडला की पाऊस पडतो व पाऊस पडला की महादेवाचे मंदिर पुन्हा पूर्ववत करायचे अशी ही प्रथा होती. त्यानुसार चांदक ग्रामस्थांनी देवाला पाण्यात कोंडून प्रार्थना केली व साकडे घातले. सदर कार्यक्रमावेळी सरपंच, उपसरपंच गावातील सर्व महिला मंडळे, महिला व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ, अबालवृद्ध, यांनी सहभाग घेतला.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…