लोणीकंद तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी ! देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगणा-या इसमास केले जेरबंद….

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक – २४/०९/२०२३ रोजी मा. श्री. विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी तपास पथकावे अधिकारी सपोनि गजानन जाधव व तपास पथकातील पोलीस नाईक ७४१९ जाधव, पोलीस नाईक ७६२१ साळुंके, पोलीस नाईक ७४४७ फरादे पोलीस नाईक ७३०९ साळुंके, पोलीस शिपाई ६४९७ ढोणे, पोलीस शिपाई ८८७४ गावडे याना गणेश उत्सवानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडु नये व पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेश उत्सव हा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करणेबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने वरील अधिकारी व अमलदार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक ७४१९ स्वप्नील जाधव व पोलीस शिपाई ८८७४ दत्ता गावडे यांना त्यांचे गोपनीय खब-यामार्फत बातमी मिळाली की, मांजरी खुर्द स्मशानभुमी समोर एक इसम उभा असुन त्यावेजवळ देशी बनावटीचे पिस्टल आहे. लागलीच पोलीस शिपाई ८८७० गावडे यांनी सदरवी बातमी तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव यांना फोनद्वारे दिली असता सपोनि गजानन जाधव यांनी सदरची बातमी श्री विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेशित केले..

लागलीच सपोनि गजानन जाधव व वरील पोलीस अंमलदार यांनी मांजरी खुर्द स्मशानभुमी या ठिकाणी यशस्वी सापळा लावून मिळालेल्या बातमीची खातरजमा करुन संशयित इसमास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत कारतुस मिळुन आल्याने त्याचेविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नमुद गुन्हयाचा पुढील अधिक तपास बाळासाहेब सकाटे, सहाय्यक पोलीस फौजदार, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. रंजनकुमार शर्मा साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. शशीकांत बोराटे सो, पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. संजय पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव, सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस नाईक स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, विनायक साळवे, अजित फरांदे, पोलीस शिपाई दत्ता गावडे, सर्व लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

18 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

20 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago