समृद्धीत शेती गेलेल्या शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक, शेतकरी परिवाराचा आरोप गंभीर आरोप.

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी

नागपूर:- हिंगणा तालुक्यातील सुकळी (घारापूरे) गावातील शेतकरी दिलीप किसन नेहारे, ज्ञानेश्वर किसन नेहारे, संगिता मनोहर कोहळे,लक्ष्मीबाई मोहन राऊत व श्रीमती रुक्माबाई किसन नेहारे यांची वडिलोपार्जित 2.50 हेक्टर आर शेती होती पैकी 1.08 हेक्टर आर शेती समृद्धी महामार्गात गेली या शेतीचा मोबदला म्हणून या परिवाराला 3,08,09,143 /- अक्षरी रुपये, तीन कोटी आठ लाख नऊ हजार एकशे त्रेचाळीस रुपये मिळायला हवे होते परंतु मिळाले फक्त 2,05,00,000 /- अक्षरी रुपये, दोन कोटी पाच लाख फक्त, मग एक कोटी रुपयांची अफरातफरी कशी झाली,तर 2017 साली समृद्धी महामार्गासाठी भुसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेंव्हा हि संपूर्ण शेती वरिल नावाप्रमाणे शेतकऱ्यांची होती सातबारा सुध्दा याच परिवाराच्या नावे होता. शासनाने त्यांच्या शेतीचा मोबदला हा याच परिवाराच्या नावे दिला त्याला अवार्ड (नजराणा) असा शब्द वापरण्यात आला हा अवार्ड सुध्दा वरील शेतकरी परिवाराच्या नावानेच दिला आहे मग हेराफेरी कोणी आणि कशी केली तर, श्री.वक्रतुंड बिल्डर्स अँन्ड लॅन्ड डेव्हलपर्स यांनी या शेतकऱ्याच्या एकुण शेतीचा सौदा दिनांक 03.04.2015 रोजी, रुपये 11,00,000/- ( अक्षरी रुपये अकरा लाख प्रती एकरा प्रमाणे झाला होता आणि करारनामा हा दिनांक 25.06.2015 या रोजी करण्यात आला होता, त्यात बिल्डर्सला शेतजमीन संपूर्ण मोबदला देऊन आपल्या नावे करण्याचे ठरले परंतु दिलेला कालावधी संपूनही बिल्डर्स संपूर्ण शेतीची रक्कम देवू शकाल नाही त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अर्ध्या शेतीची म्हणजेच 2.50 हे.आर पैकी 1.42 हे. आर. शेतजमीनीची विक्री 11.10.2017 लावून दिली परंतु त्याचेच आधी आमची 1.08 हि जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात आली होती. बिल्डर्सने याचा फायदा घेत संबंधित अधिकारी तत्कालीन तहसीलदार व काही दलाल यांनी साठ गाठ करून आमच्या आणाडी पणाचा फायदा घेत एक करोड रुपयांचेवर पैसे आम्हाला कमी दिले असा आरोपही पिडीत शेतकरी परिवाराने केला आहे सदर शेतकऱ्यांची शेती समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात आली तेंव्हा वरील बिल्डर्स यांची संमती घेण्यात आली, शेतकऱ्याच्या उर्वरित गेलेल्या जमीनीशी त्यांचा काहीच संबंध नव्हता म्हणून शेतकऱ्यांसोबत झालेला प्रकार हा दुर्दैवी असुन संबंधित मंत्री आणि त्यांच्या अधिनस्त अधीकाऱ्यांनी या गंभीर बाबी ची दखल घेऊन पिडीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकरी करत आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

15 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

16 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

16 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

16 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

17 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

17 hours ago