ऑल इंडिया पँथर सेनेचा आक्रोश मुंबईत धडकणार. विविध प्रश्नावर करणार आंदोलन.

रुपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ

मुंबई:- ऑल इंडिया पँथर सेना लवकरच मुंबई मोठे आंदोलन करणार आहे अशी माहिती प्रेस रिलिज प्रसिद्ध करून महाराष्ट्र संदेश न्युजला दिली. हे आंदोलन राज्य आणि देश पातळीवरचे अनेक मुद्द्यांना घेऊन करण्यात येणार आहे.

कोणत्या प्रश्नावर आंदोलन..

इंद्रकुमार मेघवाल हत्याकांड निषेधार्थ, गॅस, डिजेल, पेट्रोल महागाईच्या दरवाढीबाबत, महिलां, बेटीच्या रक्षणांसाठी, संविधान बचाओ, भिमाकोरेगाव दंगलीतील 35000 तरुणांवर गुन्हे दाखल झालेले त्वरीत माघार घेण्यात यावे, खुलेआम शास्ञ बाळगणाऱ्या आरएसएस सारख्या संघटेनेला तात्काळ बंदी घालण्यात यावी व कठोर शासन लागु करण्यात यावं. बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा,ओबीसी आरक्षणाची तरतुद लवकर जाहीर करण्यात यावं, मराठा आरक्षण लवकरात लवकर लागु करण्यात यावं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करुन सन्मानित करण्यात यावं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थानी भव्य दिव्य स्मारक करण्यात यावं, 250 दलित हत्याकांडाबाबत आरोपीवर कठोर शासन करण्याचं यावं, प्रत्येक पिडितांना 250000 रुपये मदत करण्यात यावी व प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना शासकीय नौकरी मध्ये सामावुन घेण्यात यावं, बेहाल शेतकऱ्यांचे, कर्जमाफ करण्यात यावे,12000,ऑट्रोसिटी प्रलंबित केसेसबाबत व इतर देशव्यापी मुद्दयावर राज्य व क्रेंद्र सरकारच्या विरोधात लवकरचं मुंबईत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकजी केदार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पँथर मुंबई धडकणार आहे अशी माहिती प्रेस रिलिज प्रसिद्ध करून देण्यात आली.

दलित, मुस्लिम, अनुसुचित जाती जमाती, भटक्या विमुक्त आदिवासी, वंचित, शोषित, पिडित, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी हा व्यापक लढा ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यामतुन तीव्र करण्यात येत आहे. राज्यातील मंत्री असंवेदनशील आहेत, राज्यसभेत, विधानसभेत बहुजनांचा वाली म्हणुन प्रश्न मांडायला कोणीही तयार नाही, मिडिया चाटुगिरी करते, मुख्यमंत्री आयकला तयार नाही, महाराष्ट्रात गुंडशाही, हिटलरशाही, हुकूमशाहीच्या प्रवृत्तीला सुरुवात झाली आहे. लोकशाही नावाला राहिली दिनदुबळयांना बंदिस्त करण्याचा डाव आखला जातो.गुलामीच्या दलदलीत बहुजनांची पोरं आडकली आहेत. अशा या भंयान संकटात माझा बहुजन समाज आहे. शिक्षणापासुन वंचित व बेघर केलं जात आहे. आज मानवता जिंवत राहीली नाही असे अनेक प्रश्न घेवुन मुंबईत हे वादळ धडकणार आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी हा वाघ मैदानात उतरुन भिडत आहे.भिडत भिडत मरण जरी आले तरी चालेलं पण पँथर शरण जाणार नाही.!

या लढयात सर्वजण ताकतीने सामिल व्हा आणि अध्यक्ष दिपकजी केदार यांचे हात बळकट करा. असे आव्हान महाराष्ट्र संदेश न्युज ला दिलेल्या प्रेस नोट मध्ये कुणाल इंगळे जिल्हाध्यक्ष यांनी केले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

10 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

10 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

11 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

11 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

11 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

12 hours ago