सिरोंचा उपविभागीय बांधकाम कार्यालयात रा,काँ पक्षाचे ता- उपाध्यक्ष- सागर मूलकला यांची भेट व अधिकाऱ्यांशी चर्चा.

चिटूर गावातील चिकलमय रस्त्याच्या कामे येत्या दाह दिवसात पूर्ण करू असे अधिकाऱ्यांची आश्वासन …

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नॅशनल हायवे 63 वाडदाम गावापासून दुर्गम भाग चिटूर आणि अमडेल्ली कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते चिकलमय झाली आहे. त्या रस्त्यावरून चिटूर आणि अमडेल्ली गावांचे नागरीक आणि विद्यार्थी मुख्यालयात येण्या – जाण्या करतात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ते पूर्ण चिकलमय झाल्याने चिकलातून येण्या- जाणे करण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. गावात जाणाऱ्या अनेक वाहन चिकलात अडकून जात आहे. ही गंभीर समस्येवर गावातील नागरिकांनी वारंवार संबंधित विभागाला माहिती देऊनही समस्या दूर करण्यात आली नाही.


अश्यातच शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला यांनी चिटूर गावात गेले असता ग्रामस्थांनी रस्त्याचे समस्या दूर करण्याची विनंती केली. त्यामुळे शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी सिरोंचा उपविभागीय बांधकाम (जिल्हा परिषद) कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्येवर तोडगा काढण्यासाठी मागणी केली. यावेळी समस्या दूर न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे इशाराही देण्यात आला आहे.

सिरोंचा उपविभागीय बांधकाम जिल्हा परिषद कार्यालयाचे अधिकाऱ्यांनी चिटूर चिकलमय रस्त्याचे समस्या येत्या दाह दिवसात दुर करू असे आश्वासन देखील देण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांच्या सह कार्यकर्ते विनोद नायडू, राजू मूलकला उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

5 mins ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

19 mins ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

1 hour ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

2 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 hours ago