व्ही.जी.इन.टी, एस.बी.सी, ओबीसीच्या मुलांसाठी हक्काच्या 72 वसतिगृहासाठी अनेक जिल्ह्यात आंदोलन.

प्रशांत जगताप

भंडारा:- देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील 2019 विधानसभा निवडनुकीला समोरे जातांना व्ही.जे.एन.टी, एस.बी.सी, ओबीसीच्या मुलासाठी 36 वसतिगृह सुरु करण्यासाठी जाने. 2019 ला शासन निर्णय जाहिर केला होता. ओबीसी भाळले अन मतांची भरभरून ओंजली भरली. मात्र सरकार भलत्याचेच अस्तित्वात आले अन सरकारचे नवे बहुजन मंत्री विजय वड़ेटटीवार यांनी ओबीसीवर अधिक उदारपणा दाखवित प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींसाठी स्वतंत्र 72 वसतिगृह सुरु करण्यासाठी 2020 ला दूसरा शासन निर्णय जाहिर केला. ओबीसीच्या मतांचा जोगवा मागन्यासाठी एकाहुन एक सरस घोषणांची सरबत्ती सुरु झाली. मात्र निर्लज्ज घोषणाकारांनी मागील 4 वर्षात एक ही घोषणा पूर्ण केली नाही. आतापर्यंत सर्वांनीच ओबीसीची भरभरून मते घेवून यथेच्छ सत्ता भोगली मात्र ओबीसी मधील भूमिहीन, अल्प भूधारक, दारिद्र्य रेषेखालील 90% लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचा, बेरोजगारीचा तसुभरही विचार केला नाही वा काम केले नाही.

कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगात आर्थिक व्यवस्था रसातळला गेली असतांना कष्टकरी, मेहनती व निर्माणकर्त्या ओबीसीने आपल्या श्रमावर भरपूर प्रमाणात कृषि उत्पन करीत भारताची अर्थ व्यवस्थेला पुन्हा उभारीला आणली. त्यावेळी भारतावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी कोणताही अडानी-अंबानी धावून आले नाही तर याउलट त्यांनी बैंकमधून घेतलेली करोड़ोची कर्जे माफ करण्यासाठी सरकारचे हात पुढे सरसावले. ज्यांच्या कष्टावर हा देश दोन वेळचं जेवतो, 130 कोटी जनतेला जगवतो, रात्री कुणालाही उपाशी झोपु देत नाही, 52% ओबीसी टैक्सच्या रूपाने सरकारची तिजोरी भरली जातेय, मात्र त्यांच्याच मूलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह बांधन्यासाठी आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी लंपडाव खेळलेला आहे. ओबीसीच्या मुलांना वसतिगृह मिळालेच पाहिजेत, नाही तर प्रत्येक जिल्ह्यात 100 मुलांसाठी स्वाधार योजना लागू कराव्या, या मागण्यासाठी ओबीसीच्या विविध संघटना आग्रही आहेत व अनेक ठिकाणी रस्त्यावर उत्तरित आहेत.

या मागनीचा पाठपुरावा करण्यासाठी ओबीसी युवा अधिकार मंच, संघर्ष वाहिनी, ओबीसी सेवा संघ, सेल्फ रेस्पेक्ट मूवमेंट, एकलव्य सेना आणि अन्य संघटनांच्या सहभागाने दिनांक 3 सप्टे 2022 ला भंडारा येथील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतल्याला हार घालून रैलीच्या माध्यमाने भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे घरी पोहोचले. त्यांना निवेदन देवून भंडाराचे लोकसभा खासदार सुनील मेंढे यांच्या घरी पोहोचले. रैलीत सहभागी विद्यार्थी, महिला व पुरुष यांनी खासदारांच्या घरासमोर अडीच तास ठीय्या आंदोलन केले. ओबीसी म्हणून निवडून आलेले ओबीसी खासदार सुनील मेंढे हे आन्दोलकाचे साधे निवेदन घेण्यासाठीही इकडे फिरकले नाही. यावर आन्दोलकांनी ख़ासदारांचा जाहिर निषेध करीत मोर्चा जिल्हाधिकारी यांच्याकड़े वळविला. जिल्हाधकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन समाप्त करण्यात आले. मात्र हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

7 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

8 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

8 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

9 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

9 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

9 hours ago