संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- नागपूर जिल्ह्यातून एक संताजनक घटना समोर आली आहे. येथील सावनेर तालुक्यातील खापा शहरात एका अल्पवयीन मुलीवर डझनभर नराधमांनी बलात्कार केला. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण नागपुर जिल्हात खळबळ उडाली आहे. गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात कौर्याची सीमा गाठली आहे. त्यामुळे नागपुरात महिला सुरक्षाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
देशाचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या एका नराधम अग्निविराने एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. त्यानंतर या नराधमाने या अल्पवयीन मुलीला मित्राच्या घरी बोलावून बलात्कार केला. यावेळी या तरुणीचे अशील फोटो व व्हिडिओ तयार केला आणि पीडित अल्पवयीन मुलीचे अशील फोटो व व्हिडिओ मित्रांना दिले. त्यानंतर मित्राने व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन डझनभरच्या नराधम आरोपींनी या तरुणीवर बलात्कार केलेची घटना सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. याप्रकरणी खापा पोलीस ठाण्यात 26 सप्टेंबर मंगळवारला समोर आली आहे. सदर प्रकरणात सहा आरोपीना अटक केली असून अग्निविर आरोपीसह पाच आरोपी फरार झाले. गोलू निखार, वेदांत विलास आवते, प्रणय डेकाटे, लीलाधर धर्मेंद्र चौरागडे, निखिल सदाशिव धांदे, सुशील कुमार धार्मिक अटक केलेले आरोपीचे नाव आहेत. मुख्य आरोपी धीरज हिवरकर, गौरव खुबाळकर, विकास हेडाऊ, स्नेहल सुरकार, लकी धार्मिक, विकी लिखार अशी फरार आरोपींची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी धीरज हिरवकर वय 21 वर्ष रा. खापा याची काही वर्षांपूर्वी अग्नि विर म्हणून नियुक्ती झाली आहे. धीरजणे अनोळखी एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले मार्च महिन्यात धीरजणे मित्र गोलू लिखार यांच्या घरी अल्पवयीन मुलीला बोलावून बलात्कार केला शिवाय अशील फोटो काढून व्हिडिओ तयार केला. आरोपी धीरज एवढ्यावर थांबला नाही तर त्याने मित्र गोलू लिखार याला अल्पवयीन मुलीचे अशील फोटो व व्हिडिओ दिला. गोलू अशील फोटो व व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गोलू व त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे अशील फोटो व्हायरल केले. अल्पवयीन मुलीला धमकी देऊन एप्रिल महिन्यात माताखेडी व लांबट पुरा परिसरातील घरात आरोपी गोलू लिखाण याच्या घरात अल्पवयीन मुलीवर या नराधमानी बलात्कार केला.
त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी डझनच्यावर नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला सदर घटनेत जवळपास दोन डझन आरोपी असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. सदर घटनेचे मुख्य आरोपी धीरज हिवरकर याची अग्निवीर म्हणून नियुक्ती झाली आहे. निखिल सदाशिव धांदे बीएसएफ ची नियुक्तीपत्र प्राप्त झाले ही माहिती मिळाली. सदर प्रकरणात भांदवि 354 A, D, 376 A, D, 506, सह कलम 4, 6, 11, 12 पास्को अधिनियम 2012 सह कलम 67A, पीटा ऍक्ट 2000 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणात तपास पोलीस विभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
कशी आली घटना उघकीस… आरोपींना अशील फोटो व चित्रफित वायरल केल्याची माहिती पीडित अल्पवयीन मुलीला मिळाली बदनामीच्या भीतीमुळे ती आत्महत्या करण्याच्या विचारात होती यादरम्यान अल्पवयीन मुलीच्या आई – वडिलांना शंका आली 25 सप्टेंबर सोमवारला तिला विश्वासात घेतल्यावर तिने आई-वडिलांना झालेला प्रकार सांगितला मंगळवार ला खापा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणा मध्ये बारा आरोपी विरुद्ध पास्को, आयपीसी, आयटी च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एका आरोपीला अग्निवीर तर दुसऱ्या आरोपीला बीएसएफ नियुक्ती झाल्याचे पत्र आले आहे अशी माहिती हर्ष पोतदार. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिली.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…