हिंगणघाट तालुक्यातील प्रसिद्ध संत भोजाजी महाराज देवस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कर्डीले यांचा सत्कार.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

वर्धा,दि.४सप्टेंबर:- वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच रुजू झालेले राहुल कर्डीले यांची हिंगणघाट तालुक्यातील प्रसिध्द आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानाच्या वतीने अध्यक्ष डॉ. विजय पर्बंत व वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजुरकर यांनी भेट घेऊन सत्कार करण्यात आला.

श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा द्वारा संचालित निराधार वृद्धांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आलेल्या आनंद आश्रम, प्रसादालय व महाराजांच्या पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या नारळ फुलांच्या निर्माल्यापासून तयार करण्यात येणाऱ्या धूपबत्ती प्रकल्प आणि लवकरच सुरु करण्यात येत असलेल्या आरोग्य सेवा केंद्राबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायाचे प्रतिक म्हणून मान्यता असणारे तुळशीचे रोपटे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना भेट देण्यात आले. तसेच हिंगणघाट शहरांची जिवनदायनी वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजूरकर व देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी गेल्या महिन्यात झालेल्या महापुरामुळे देवस्थानचे अतोनात नुकसान झाले होते, त्याबद्दल सविस्तर चर्चा करून आजनसरा येथे भेटीचे निमंत्रण देण्यात आले.

या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पत्रानुसार केंद्रीय पर्यटन मंत्री यांचा सकारात्मक पत्राचार व मार्गदर्शनानुसार केंद्रीय पर्यटन विभागात समावेश करण्यसाठी विकास आराखडा तसेच महाराष्ट्र शासनाकडुन केंद्राकडे शिफारस करण्यची विनंती अध्यक्ष डॉ. पर्बत यांनी केली त्यामुळे जिल्हाधिकारी कर्डिले यांनी 1सप्टेंबर ला हिंगणघाट येथे आले असताना आमदार समीर कुनावार यांच्या नेतृत्वात सदर पर्यटन तीर्थक्षेत्राबद्दल उपविभागीय अधिकारी हिंगनघाट यांच्या कार्यालयात चर्चा करण्यात आली.

हिंगणघाट तालुक्यातील भोजाजी महाराजांचे देवस्थान हज़ारों भाविकांच्या श्रद्धेचे आणि आस्थेचे स्थळ असल्यामुळे आपण पुढाकार घेऊन विकास आरखड़ा त्वरित तयार करुण भाविक भक्तांच्या सुविधेसाठी अदध्यावत बांधकाम तसेच विकास व्हावा यासाठी शासनाकडे आग्रही मागणी करणार असल्याचे संगितले, यावेळी आमदार समीर कुणावार जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सोनोने अध्यक्ष डॉ. विजय पर्बत, गटविकास अधिकारी मोहोड, जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष नितिन मडवी,आर पी आय चे नेते शंकर मुंजेवार यांची उपस्थिती होती.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

5 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

5 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

6 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

6 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

6 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

7 hours ago