सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुहेतून माँ वैष्णाे देवी प्रतीकृतीचे दर्शन; देखाव्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांच्याहस्ते उद्घाटन. 

बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाचा काेराेनानंतर बीडकरांसाठी अगळा वेगळा देखावा…

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहुुन बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाने वेगळी अाेळख निर्माण केली अाहे. यंदाच्या गणेश उत्सवामध्ये सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुफेतून माँ वैष्णाे देवी प्रतीकृतीचे दर्शनाचा देखावा साकारला अाहे. या देखाव्याचे उद‌्घाटन साेमवारी (दि. ५) रात्री अाठ वाजता जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांच्या हस्ते हाेणार अाहे.

मंडळाचे मार्गदर्शक गिरीष गिलडा सांगितले की, सोमवारी ( दि.५ ) रात्री आठ वाजता शनी मंदिर गल्ली, विठ्ठल मंदिर चौक पेठ बीड येथे देखाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पेठ बीड कृती समितीचे अध्यक्ष अमृत काका सारडा, राजयोग फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम धुत यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बीड शहरामध्ये बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाची स्थापना १९५४ मध्ये झालेली अाहे. सध्या मंडळाचे हे ६८ वे वर्ष अाहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम राबवण्यात अालेले अाहे. दरवर्षी गणेश उत्सव थाटामध्ये साजरा करण्याची मंडळाची परंपरा अाहे. यंदाच्या वर्षी मंडळाने बीडकरांसाठी सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुफेतून माँ वैष्णाे देवी प्रतीकृतीचे दर्शन देखावा साकारला अाहे. दाेन वर्षापुर्वी बर्फाणी बाबा अमरनाथ दर्शन देखावा पाहण्यासाठी महिला – पुरुषांच्या रांगा हाेत्या. मंडळाने हा देखावा भाविकांसाठी माेफत ठेवला हाेता. बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाचा काेराेनानंतर बीडकरांसाठी अागळा वेगळा देखावा पाहण्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे अावाहन बीड चा राजा न्यु गणेश मित्र मंडळ अध्यक्ष बबलू गिलडा, कार्याध्यक्ष विशाल शर्मा, उपाध्यक्ष व्यंकटेश दोडे, सचिव सतीश पगारिया, कोषाध्यक्ष कृष्णा मुंदडा, सह नरेश मुंदडा, प्रगेश‌ कुलकर्णी, अभिजीत दोडे, फामजी पारिख, पुष्कर मुंदडा, गोविंद शर्मा, गोपाल शर्मा, मयुर गिलडा, ऋषिकेश मुंदडा, श्रेयस गिलडा, राम पारिख, शाम पारिख, गोविंद शर्मा, गणेश लोंढे यांनी केले आहे

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

3 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

3 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

4 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

4 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

5 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

5 hours ago