पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील चंदननगर पोलीस स्टेशन पोलिसांनी धडक कारवाई करत चोरांना बेड्या ठोकल्याची घटना समोर आली आहे. शहरातील गुन्हेगारांवर पोलिसाचा वचप निर्माण करण्यात येत असल्याचे या घटनेवरून दिसून येते आहे.
प्राप्त माहितीनुसार चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोहवा सचिण रणदिवे, पोशि नामदेव गडदरे, पोशि अतुल आदक असे रात्रपाळी ड्युटीस चंदननगर पोलीस स्टेशनला हजर राहुन पिटर मोबाईल मधुन रात्रगस्त पेट्रोलिंग करत करत असताना सकाळच्या सुमारास गणेशनगर वडगावशेरी या ठिकाणी आले असता पोलीस अंमलदार रणदिव व गडदरे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जुना मुंढवारोड बॉलीवुड थेटरचे समोरील सार्वजनिक रोडवर, पत्र्याचे कडेला वडगावशेरी या ठिकाणी दोन इसम नारंगी रंगाचे एका केटीएम गाडी जवळ संशयीत रित्या थांबलेले आहेत अशी खात्रीशी बातमी मिळाली.
ही बातमी मिळताच पोलीस कर्मचारी आपल्या फौजफाट्या सह बॉलीवुड थेटर जवळ पोहचले यावेळी संशयीतरित्या उभे असलेले दोन इसम पोलिसाना पाहताच त्यांचे कडील नारंगी रंगाची दुचाकी गाडी सोडुन तेथुन पळुन जावु लागले लागलीच त्यांना पोलीस स्टाफचे मदतीने पकडुन त्यांचे पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे कविराज राम बिक, वय ३० वर्षे, रा- गीली आण्णा यांचेकडे भाड्याने हनुमान मंदिराचे बाजुला रामवाडी नगररोड पुणे, समिर साहेबलाल शेख, वय २४ वर्षे, रा- स.नं ५६/२, पो.स्टे ऑफिसचे दुचाकी बाजुला माळवाडी, वडगावशेरी पुणे अशी असल्याची सांगीतली असुन त्यांचेकडे असलेल्या नारंगी रंगाचे गाडी नं. MH.24.BQ.3682 हिचे बाबत विचारपुस केली असता त्यांनी
उडवाउडवीची उत्तरे दिली.
यावेळी महात्मा फुले मार्शल वरील पोलीस अंमलदार पोशि थोरात व पोशि केदारी यांना सदर ठिकाणी बोलावुन घेवुन स्टाफचे मदतीने त्यांना दोघांनाही त्यांचे कडील दुचाकी गाडीसह पुढील चौकशी करीता चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन त्यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सदरची दुचाकी गाडी ही आम्ही दोघांनी रात्री वडगवशेरी भागातुन चोरी केली आहे अशी कबुली दिली.
याबाबत चंदननगर पोलीस स्टेशन कडील अभिलेखाची पडताळणी केली असता चंदननगर पो.स्टे गु.न.नं. ४४६/२०२३ भादवि कलम ३९४, ४२७, ३४, ऑर्म अॅक्ट कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. वरील दोन्ही आरोपींना दाखल गुन्हयामध्ये अटक करण्यात आली अशी माहिती तान्हाजी शेगर, पोलीस उपनिरीक्षक चंदननगर पो.स्टे. पुणे शहर यांनी दिली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…