पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे विमाननगर परिसरात एका हॉटेल मधून पार्टी करुन घरी जात असलेल्या युवतीवर घरी सोडण्याचा बाहाण्याने तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एकास बेड्या ठोकल्या आहे. दत्तात्रय खरात वय 28 वर्ष, रा. विमाननगर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
एका 32 वर्षीय युवतीने विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. विमाननगर भागात बॅकयार्ड कॅफे आहे. तरुणी, तिची मैत्रीण, दोन मित्र गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी तेथे गेले होते. हॉटेल दहा हजार रुपयांचे बिल झाले. तरुणीने डेबिट कार्डद्वारे बिल अदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेबिट कार्डच्या सांकेतिक शब्दात चूक झाल्याने बिल अदा होऊ शकले नाही. त्यानंतर उपाहारगृहातील व्यवस्थापक आणि कामगारांनी युवतीला शिवीगाळ करुन दोन मोबाइल संच, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबीट कार्ड ताब्यात घेतले. बिल भरल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू परत करेल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर तरुणी हॉटेल मध्ये थांबली. त्यावेळी हॉटेल मध्ये एका ग्राहक तरुणाने या युवतीला मदत करण्याचा बहाणा केला. या युवतीला घरी सोडण्याचा बहाणा करुन खराडी भागातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला.
यानंतर या युवतीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी खरात याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…