नगर: फिल्मी स्टाईलने केलेल्या या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अखेर सात महिन्यांनंतर लावला छळा, दोन आरोपींना ठोकल्या बेळ्या.

✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर/ वाळकी :- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पैसे उसने देण्याच्या बहाण्याने 25 वर्षीय तरूणाला बोलावून घेत त्याला जास्त दारू पाजली. त्यानंतर त्याला मोटारसायकलवर बसवून श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी कॅनॉलजवळ नेऊन पाण्यात फेकून देत त्याची हत्या करण्यात आली.

हे हत्याकांड अतिशय थंड डोक्याने कट रचत, फिल्मी स्टाईलने केलेल्या या खुनाला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर सात महिन्यांनंतर वाचा फोडली असून, दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सागर कुमार झरेकर वय 25 वर्ष रा. घोसपुरी ता. नगर असे मयत तरूणाचे नाव आहे. तो दि.14 जानेवारी 2022 पासून घरातून गायब झाला होता. त्याच्या घरच्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचा दोघांनी खून केला असल्याची माहिती तब्बल 7 महिन्यांनंतर समोर आली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विश्वनाथ ऊर्फ सुशांत सोपान भापकर वय 28, रा.भापकर वस्ती, कोळगाव ता. श्रीगोंदा व त्याचा मित्र गौरव गोरक्ष साके वय 20 रा. साकेवाडी, ता. श्रीगोंदा या दोघांना जेरबंद केले.

या खून प्रकरणाची पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. मयत सागर झरेकर व आरोपी विश्वनाथ ऊर्फ सुशांत भापकर यांची ओळख होती. काही वर्षांपूर्वी मयत सागरच्या नातेवाईक तरूणीचे श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात लग्न झाले. मात्र, आरोपी भापकर तिला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी त्रास देत होता. परंतु, तिने त्यास नकार दिला. तिला अद्दल घडविण्यासाठी आरोपी भापकर याने प्रयत्न केले. अनेकदा त्रास दिल्यानंतर तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचाही त्याने प्रयत्न केला.

पुढे त्याने तिचा नातेवाईक असलेल्या सागर याच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी मित्र गौरव साके यास 50 हजारांची सुपारी दिली. एक दिवस सागरला पैशांची अडचण असल्याने त्याने आरोपी भापकरला सांगितले. त्याने नियोजित कटानुसार दि.14 जानेवारी 2022 रोजी रात्री त्याला चिखली घाटात बोलावले. तेथे घाटाच्या बाजूस असलेल्या फॉरेस्टमध्ये सागरला नेऊन त्यास जास्त प्रमाणात दारू पाजली. नंतर दोघे त्यास मोटारसायकलवर बसवून श्रीगोंदा तालुक्यातील मोहरवाडी गावाच्या शिवारात घेऊन गेले. रात्री 9.30 च्या सुमारास त्याला कुकडी कॅनॉलच्या पाण्यात फेकून दिले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

17 mins ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

35 mins ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

55 mins ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

1 hour ago

विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर आढळल्यास नागरिकांनी तत्काळ माहिती द्यावी, आयकर विभागाचे आवाहन.

निवडणुकीतील काळ्या पैशाबाबत नागरीक करू शकतील थेट आयकर विभागाकडे तक्रार; टोल-फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप किंवा ई…

1 hour ago

मिरज येथील वालनेस हॉस्पिटल (मिशन हॉस्पिटल) येथे होणाऱ्या आंदोलनाला सेवक कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरज:- येथील आरोग्य पंढरीला नाव लवकिक…

1 hour ago