पोलिसांनी वाहतूक नियम मोडल्यास आता पोलिसांवर पण होणार कारवाई.

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी

मुंबई:- वाहतूक करताना किंवा गाडी चालवताना सामान्य नागरिकांना जसे कायद्याने नियम दिले आहेत तसे नियम पोलीसांना देखील आहेत. यातीलच काही नियम पोलीसांनी मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

अनेक वेळा आपण पाहिलं असेल की वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करण्यात येतो.याद्वारे ते वाहन चालकांवर दंड देखील ठोठावत असतात मात्र अशा पोलीसांवर कार्यवाही होणार असल्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी आदेश दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, पोलीस घटकातील पोलीस अधिकारी / अंमलदार कसूरदार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतः च्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो किंवा चित्रीकरण करून काही कालावधी नंतर ई चलान मशिन मध्ये अपलोड करतात तसेच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचा फोटो टाकतात त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखणे अशक्य होते अशा आशयाची तक्रार अर्ज प्राप्त झाली आहे.

त्यानुसार आदेशित करण्यात येते की वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चलान मशिनचाच वापर करावा लागणार आहे. जे वाहतूक पोलीस कारवाईवेळी खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काढले आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

14 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

16 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago