मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर भादवी 306 दाखल करा: दादासाहेब शेळके

शासकीय दवाखाना नांदेड 24 जणांचे मृत्यू प्रकरण, शिक्षण आणि आरोग्य संपविण्याची सुपारी राज्य
शासनाने घेतली – भिम टायगर सेना

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- ठाणे, औरंगाबाद नंतर कालच गुरुगोविंद सिंग शासकीय हॉस्पिटल, नांदेड येथे एका दिवसात 24 जनांचा मृत्यू झाला आहे. त्यात 12 बालके आहेत. त्याबद्दल भीम टायगर सेनेचे नेते दादासाहेब शेळके यांनी राज्य शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मुळातच एक एक आमदार फोडण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करणारे सरकार व सरकार मधील पक्ष या तिन्ही पक्षाचे अनैतिक व असंवैधानिक सरकार आहे. याच शिंदे सरकारने या राज्यातील बहुजन समाजाला उध्वस्त करण्यासाठी राज्यातील 15 हजार शाळा बंद करून 18 हजार नवीन देशी दारू दुकान परवाना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ह्या निर्णयाचा मी भिम टायगर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. राज्य शासनाचा घेतलेला निर्णय हा जनतेच्या आरोग्याशी खेळुन बहुजनांना जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठीच राज्य शासनाने वरील निर्णय घेतला आहे.त्याचेच ज्वलंत उदा. म्हणजे काल नांदेड येथील शासकीय रुग्णालयात एका दिवसात 24 जणांचा झालेला मृत्यू होय.मुळातच भारतीय संविधान भाग 4 directive principles of states policy अर्थात राज्याची निती निर्देशक तत्वे आर्टिकल 47 नुसार राज्य शासनाचे नशेली पदार्थावर बंदी आणणे व राज्यातील लोकांचे आरोग्यमान उंचावणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असताना उलट राज्यात 18000 देशी दारूचे दुकान परवाने देऊन राज्यातील जनतेला जीवनातून उठविण्याचा विडाच राज्य शासनाने उचललेला दिसतो.ह्या दारू-परवाण्यामुळे आपले प्रगतीशील महाराष्ट्र राज्य हे बिहार व उत्तर प्रदेश पेक्षाही मागास करण्याची शपथ राज्य शासनाचे घेतलेली दिसते.

भारतीय संविधान भाग 3 fundamental rights अर्थात अर्थात मूलभूत हक्क आर्टिकल 21 A नुसार शिक्षण हे राज्यातील नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्या मूलभूत अधिकाराला छेद देण्याचा अधिकार राज्य सरकारला नसताना सुद्धा इथल्या बहुजन, दलित, आदिवासी मुस्लिम व राज्यातील नागरिकाच्या जीवनाची राख रांगोळी करून परत मनुस्मृति लागू करण्या साठीच हा राज्य शासनाचा घेतलेला निर्णय आहे. कारण मनुस्मृति नुसार अध्याय 1 श्लोक क्रमांक 31 मध्ये लिहिलेले आहे.

“लोकांना तुवि वृद्ध यर्थ मुख बाहु रुपादत!
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र निर्वर्तयत!!
अर्थ: इथे ब्राह्मण सोडून कोणालाही शिक्षण
घेण्याचा अधिकार नाही. सरकार ##वादी विचार सरणीचा असल्यामुळेच त्यांनी 18 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच हे सरकार आमदार फोडणे कार्यकर्ते फोडणे शासकीय तिजोरीची लूट करणे भ्रष्टाचार करणे
आदी कामात गुंग झालेले असल्यामुळे त्यांचे कोणत्याही विभागावर नियंत्रण नाही त्यामुळे त्यांना राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचे काही घेणे देणे नाही.

ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 जनांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. त्या 24 जणांच्या मृत्यूस कारणीभूत धरून अशा निष्काळजी व भ्रष्टाचारी राज्य सरकारला राष्ट्रपती महोदय यांनी तात्काळ बरखास्त करावे. तसेच 24 जणांच्या मृत्यूस कारणीभूत धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री यांच्यावर भादवी 306 नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी. अशी मागणी भिम टायगर सेनेच्या वतीने राष्ट्रपती महोदय यांच्याकडे मागणी करत आहेत की जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत व शासनास कायद्याचे महत्त्व कळेल त्यामुळे शासन चुकीचे निर्णय घेणार नाही.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

20 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago