डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी चिंचवड:- गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण व सोलापूर परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 5 पिस्टल व 10 जिवंत काडतुससह अटक केली आहे. त्या पथकाच्या कामगिरीचे पोलिसांनी आयुक्तांनी कौतुक केले आहे.1) सचिन उत्तम महाजन (रा. मु. पोस्ट सुरवड, ता, इंदापूर जि. पुणे 2) संतोष विनायक नातू (रा. ४४-३४५ महर्षी नगर झांबरे पॅलेस जवळ चिंतामणी बिल्डिंग स्वारगेट पुणे) 3) राहुल उर्फ खंडू गणपत ढवळे (रा. विठ्ठल मंदिर जवळ मु.पो पिंपळगाव ता.दौंड जिल्हा पुणे आणि अस्लम अहमद शेख (रा.16 नंबर ,पवार गल्ली नं. 5 थेरगाव) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार पोलिसा आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दौऱ्याच्या अनुषंगाने व गणेश उत्सव काळात हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता संशियित तपासणी मोहीम व गुन्हेगारींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत पुणे गुन्हे शाखेच्या सर्व अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.
या सूचनेच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार सहाय्य पोलीस निरीक्षक उद्धव खाडे व माहिती काढत असताना पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार रमेश गायकवाड, पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी व विजय नळगे यांना माहिती मिळाली की एक इसम जगताप डेअरी चौक साई मंदिर समोरील ब्रिज खाली थांबलेला असून त्याच्या जवळ पिस्टल सारखे हत्यार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून थांबलेला असलम शेख या नावाच्या इसमाला ताब्यात घेतले. त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले त्याच्या विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अटक आरोपी असलम शेख याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने पिस्टल विक्री करणाऱ्यांची नावे सांगितली. त्यानुसार पथकाने 3 जणांना ताब्यात घेतले पोलीस कोठीडीत पथकाने त्यांच्याकडे कौशल्य पूर्व तपास करून त्यांच्याकडून 4 पिस्टलआणि 10 जिवंत काडतुस हस्तगत केली. या गुन्ह्यात आतापर्यंत 2 लाख 55 हजार रुपये किमतीचे 5 देशी बनावटीचे पिस्टल आणि 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार गणेश गायकवाड हे करीत आहे.
आरोपी सचिन महाजन, संतोष नातू व राहुल ढवळे हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुद्ध पुणे शहर व पुणे ग्रामीण व सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी साठी जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी सचिन महाजन यांच्यावर मोका अंतर्गत पुणे ग्रामीण येथे कारवाई करण्यात आलेली आहे तर आरोपी संतोष नातू त्याच्यावर पुणे शहर येथे तडीपार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्य पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्य पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्यक फौजदार रमेश गायकवाड, अमर राऊत, पोलिस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरी गोसावी, विजय नलगे, सुनील कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, प्रदीप गायकवाड, शैलेश मगर, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस प्रदीप गुट्टे भरत गाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…