अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-९८२२७२४१३६
सावनेर:- श्री.क्षेत्र वाकी येथील बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स ३ सप्टेंबर ला. प.पु.काशिनाथ नाना डाहाके (पाटील) यांच्या वाकी स्थित वाड्यातून दुपारी ३ वाजता भव्य दिव्य शाही संदल निघून सायंकाळी ६ वाजता वाकी दरबार येथे पोहोचला. परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वराव डहाके (पाटील) यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. नंतर बाबांना चादर चढवण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार सुनीलबाबू केदार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण झाले. रात्री मिलाद व कव्वाली चा कार्यक्रम झाला.
४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता कुराण शरीफचा कार्यक्रम होऊन उर्साची समाप्ती झाली. या उर्स मध्ये हजारो भक्तांनी बाबांचे दर्शन घेतल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरराव डाहाके(पाटील), सचिव ज्ञानेश्वरराव डहाके, विश्वस्त-मधुकर टेकाडे, बाबुराव ताजणे, सचिन डांगोरे यांच्यामार्फत मिळाली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…