युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका महिला वकिलाने आपल्याच सहकारी वकीलावर अत्याचार केलाचा गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ माजली आहे.
वकीलाने ब्लॅकमेल करीत आपल्या सहकारी महिला वकिलावरच वारंवार अत्याचार केल्या. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी वकीलासह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कमलेश वाघदरे वय 46 वर्ष, रा. सोनेगाव आणि त्याचा मित्र आदित्य चौधरी अशी आरोपींची नावे सांगण्यात येतात.
पेशाने वकील असलेला कमलेश वाघदरे आणि नागपूर येथील आकारनगर येथील रहिवासी 46 वर्षीय महिला पेशाने वकिल असून आहेत. दोघेही नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात. यामुळे एकमेकांचे परिचितही आहेत. कमलेश अनेकदा पीडितेच्या घरी जायचा. याच दरम्यान कमलेशने तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा पीडितेचा आरोप आहे. 24 मार्च 2014 ते 27 मार्च 2022 दरम्यान घरी आणि कार्यालयात वारंवार अत्याचार करण्यात आला अशा आरोप यावेळी करण्यात आला.
कमलेशने तिला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचाही पीडितेचा आरोप आहे. विरोध केल्यास कमलेश जातीवाचक शिवीगाळही करायचा. कमलेशचा मित्र आदित्य यानेही पीडितेच्या घराखाली येऊन तिला शिवीगाळ केली. आदित्यने गुंड आणून तिच्या पतीला मारहाण केली आणि तिच्या मुलीला घरातून पळवून नेण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कमलेश आणि आदित्यविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…