खरा शिक्षक दिन कोणता? 5 सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा करू नये?

भारतात 5 सप्टेंबर ला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. पण खरंच हा खरा शिक्षक दिंन आहे काय? हा प्रश्न निर्माण होतो. 5 सप्टेंबर ला डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा करताना आपण खऱ्या शिक्षकाला आपण ओळखू शकलो काय?

ज्या वेळेस महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी एक महात्मा घरो घरी ज्ञानाची ज्योती पेटवत सुटला होता. एक रणरागिणी क्रांतीची मशाल घेऊन माती, गोटे, विटा आणि शेनाचा मारा झेलत होती. प्रत्येक मनुष्यात शिक्षाणाच्या क्रांतीची बीजे पेरत होती. हजारो वर्षाचा गुलामीत करणाऱ्यांना वाचा फोडत होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे हे प्राशन करेल ते गुरागुरल्या वीणा राहणार नाही. पण आपण कुठल दूध प्राशन केलं आज की आपला इतिहास विसरलो. त्यामुळे आज आपण मानसिक गुलामीच्या कीचळात पडून आहे. विचार शक्ती ग्राहान असल्या सारखे.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. डॉ.राधाकृष्णन हे सार्वजनिक जीवनात येण्यापूर्वीच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी आपल्या देशात 100 वर्षांपूर्वीच प्राथमिक शिक्षण मोफत आणि सर्वांसाठी सुरु केलेले होते, म्हणजे 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी आपल्या देशात पहिली मुलींची आणि 1852 साली मुलांची शाळा सुरु केली. राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर 40 वर्षांपूर्वी महात्मा फुले-सावित्रीबाई यांनी शाळा सुरु केली. कर्तृत्व आणि कालानुक्रमाप्रमाणे स्वाभाविकपणे/न्यायाने शिक्षक दिनाचा मान फुले दाम्पत्याला मिळायला हवा होता. हे न्याय सांगत होते.

महात्मा फुले यांनी स्वतः च्या कुटुंबापासून महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जाति धर्मातील मुलींना व मुलांना फुले यांच्यामुळे शिक्षण मिळाले. समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढायचे असेल तर प्रथम मुलींना शिकवा, असे महात्मा फुले म्हणायचे, ते केवळ बोलके सुधारक नव्हते, तर कर्ते सुधारक होते. राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध होते, असे त्यांचे चिरंजीव डॉ.सर्वपल्ली गोपाल सांगतात. (Ref.R asha krishna A Biography-S.Gopal) महात्मा फुले हे सुधारणावादी, क्रांतिकारक, निडर, पुरोगामी, समतावादी साहित्यिक होते, त्यांच्या साहित्यातून सामाजिक, शैक्षणिक अशी झाली क्रांती झाली. त्यांचे साहित्य करोडो लोकांना आत्मभान देणारे होते.

तेच दुसरीकडे सर्वपल्ली राधाकृष्णन हे वैदिक/सनातनी साहित्याचे लेखक होते. वेदांत, गीता, ब्रह्मसूत्र, क्राईम ऑफ लीला इत्यादी त्यांच्या लेखनाचे विषय होते. ते सनातनी विचारांचे होते. त्यांनी कधी जमिनीवर येऊन ज्ञानार्जनाचे काम केले नाही.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी ज्या वेळी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यावेळी शिक्षणाचे साहित्य उपलब्ध नव्हते ते त्यांनी निर्माण केलं. त्यात त्यांनी सत्याचा बोध घेणारे शिक्षण प्रत्येकाला मिळावे म्हणून दिवस रात्र झटले. त्यांच्या शिक्षण रुपी पाना पिउन पिउन मुके बोलू लागले, महिला गगनाला लाजवेल अशी प्रगती करू लागली.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी एका तरुणाच्या पीएच. डीच्या प्रबंधाचे चौर्य करून तो प्रबंध स्वतःच्या नावावर प्रकाशित केला, तेंव्हा तो तरुण राधाकृष्णन यांच्या विरुद्ध कलकत्ता हायकोर्टात गेला. (संदर्भ-ज्यूं मछली बिन नीर-आचार्य रजनीश,पृष्ठ क्र.170,171) त्यामुळे चोराच्या नावाने शिक्षक दिन साजरा करण्यापेक्षा तो प्रामाणिक महात्मा फुले-सावित्रीबाई यांच्या नावाने साजरा होणे हे आपल्या देशाच्या, शिक्षण खात्याच्या व शिक्षकांच्या दृष्टीने स्वाभिमानाची बाब आहे.याचा आपण सर्वांनी गांमभीर्याने विचार करून अंमलबजावणी करावी.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

18 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

20 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago