✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शेवटचे पाच दिवस देखाव्यांना रात्री बारापर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांना रात्री बारांपर्यंत देखावे पाहता येणार असून, ध्वनिक्षेपकही लावता येणार आहेत.
सोमवार (दि.5) ते शुक्रवार (दि.9) हे आदेश लागू राहणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत सूट देण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निर्णय घेण्यासाठी शासनामार्फत प्राधिकृत केले आहे. त्यानुसार वर्षभरात दहा प्रुमख उत्सवांसाठी ध्वनिप्रदूषणाची पातळी न ओलांडता रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक लावता येत असतात. दरम्यान, गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी तीन दिवसांची वाढीव मुदत द्यावी, अशी मागणी मंडळांनी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी गंगाथरन यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करत गणेशोत्सव काळात तीन दिवस ध्वनिक्षेपक रात्री 12 पर्यंत वाजवण्यास परवानगी दिली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…