राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी तयार होत आहेत. अनेकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत उच्चपदा पर्यतची झेप घेतली आहे. पण हल्ली अनेक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थी अनेक अनं शिक्षक एक अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिक्षणासारखा महत्वाच्या मुदयावर शासन प्रशासन लक्ष दयायला तयार नाही. चंद्रपूर जिल्हयातील अडेगाव येथे शिक्षकाची मागणी करित पालकांनी चिमुकल्यांसह आज दि.7 रोजी शाळेला कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला. जोपर्यत शाळेला शिक्षक देणार नाही तोपर्यत शाळेच कुलूप उघडणार नाही असा गर्भीत इशारा दिला.
चंद्रपूर जिल्हयाच्या व राज्याच्या सिमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाकडे लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष होत आहे.यामुळे तालुक्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे.तर काही गावात आरोग्याची सुविधा नसल्याने नागरिकांचे बेहाल होत आहेत.आता तर उदयाचे भविष्य असणा-या चिमुकल्यांना शिकविण्याकरिता शिक्षकच नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे.या शाळेत एकून 66 विद्यार्थी शिक्षण घेतात.पण शाळेच्या स्थापनेपासून या गावात पाचवीपर्यतचे शिक्षण देण्यासाठी केवळ दोनच शिक्षक आहे.गावातील सुज्ञ नागरिकांनी,शाळा व्यवस्थापन समितीने, वारंवार प्रशासनाकडे शाळेत पुन्हा एक शिक्षक देण्याची मागणी केली.पण याकडे पुरते दुर्लक्ष करण्यात आले.यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी गोंडपिपरी पंचायत समितीच्या शिक्षणाधिका-यांना निवेदन दिले.सात तारेखपर्यत शाळेत एका शिक्षकांची नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकू असा इशारा त्यांनी दिला.आज सात तारीख आली.पण प्रशासनाने गावक-यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे आज गावातील नागरिक,पाल्य व विद्यार्थी आपला नियमीत पोशाख लाउन,दप्तर घेउन शाळेत गेले.व त्यांनी शाळेला थेट कुलूपच ठोकल.जोपर्यत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यत हा कुलूप असाच कायम राहिल.असा सज्जड इशारा अडेगाववासियांनी दिला.
गोंडपिपरी तालुका प्रभारीच्या भरवशावर
राज्याच्या सिमेवरील गोंडपिपरी तालुक्यात तहसिलदार,मुख्याधिकारी व अनेक विभाग हे प्रभारी अधिका-यांच्या खांदयावर आहेत.त्यामुळे नागरिकांना विविध कामामध्ये मोठाच अळथळा येत आहे.छोटे छोटे काम करण्यासाठी तिन तिन दिवस अधिका-यांची वाट बघावी लागत आहे.तालुक्यात तहसिलदार सारखे महत्वाचे पदही प्रभारी अधिका-यांच्या खांदयावर आहे.कधीकाळी आपल्या मर्जीतला तहसिलदार आणण्यासाठी तप्तर असलेले आमदार सुुभाष धोटे यांचे याकडे लक्ष नाही.पुन्हा किती दिवस तालुका प्रशासनाचे ओझे प्रभा-यांच्या खांदयावर वाहणार असा संतप्त सवाल आता तालुकावासिय विचारत आहेत.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…