दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जयंती निमित्त ‘आम्ही मराठी’ पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन.

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उरण:- काँग्रेसचे ज्येष्ठ प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते म्हणून ज्यांची सर्वत्र ओळख आहे. असे दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम पदाजी म्हात्रे यांच्या जयंती निमित्त एकता कँटलिस्ट, कोकण श्रमिक संघ, व्यावसायिक विक्रेता संघ आणि आगरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि 7 ऑक्टोंबर 2023 रोजी आदय क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल येथे सकाळी 10 वाजता रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांचा मराठमोळा पोवाडा व स्फूर्ती गीतांचा प्रबोधनपर शाहिरी कार्यक्रम “आम्ही मराठी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी शाम पदाजी म्हात्रे यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कामगार, विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, शाम म्हात्रे साहेबांचे चाहत्यांनी व नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कामगार नेत्या कु.श्रुती शाम म्हात्रे याप्रामुख्याने उपस्थित होत्या.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

14 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago