मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर “होऊ दे चर्चा” हा उपक्रम राबविण्याचे सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिक पदाधिकारी यांना सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरातील व ग्रामीण भागातील जनतेला “होऊ दे चर्चा” निमित्त संवाद दौरा कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे.
त्यानुसार उपनेते अनिश गाढवे, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, पूर्व विदर्भ महिला संघटिका प्राध्यापक सौ. शिल्पाताई बोडके तथा हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश कांबळे, सहसंपर्क प्रमुख रविभाऊ बालपांडे, जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापूरकर, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने, जिल्हा महिला संघटिका सौ. संगीता कडू यांच्या उपस्थितीत दिनांक 7 ऑक्टोबर रोज शनिवारला 4.00 वाजता हिंगणघाट तालुक्यातील सातेफळ येथे शाखा फलकाचे अनावरण कार्यक्रम करण्यात आले.
त्या शाखेचे शाखाप्रमुख सुधाकर अगडे तथा त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते व त्यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. तसेच गावकऱ्यांच्या समवेत शाखा उद्घाटन कार्यक्रम आटोपून “होऊ दे चर्चा” या कार्यक्रमाची सुरवात केली यावेळी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या ज्या फसव्या योजना व फसवे आश्वासन याबद्दल जनतेशी मान्यवरांनी संवाद साधून ज्या नऊ वर्षात या भाजपा सरकारने जसे उज्वला गॅस, महागाई, बेरोजगारी तथा सर्व सरकारी यंत्रणेचा वापर व खाजगीकरण, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव न देने. तसेच उद्धव ठाकरे हे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले असता त्यांनी शेतकऱ्यांना पहिल्याच मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये (कॅबिनेटमध्ये) शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत सरसकट सातबारा कोरा करून कर्जमुक्त केले. हे सुद्धा या ठिकाणी विषद करून इतर सर्व विषयावर जनतेशी संवाद साधला आणि जनतेने सुद्धा या ठिकाणी प्रतिसाद नोंदविला.
यावेळी तालुक्यातील बुरकोणी, अल्लीपूर तथा मोजरी (शेकापूर) या ठिकाणी असेच “होऊ दे चर्चा” कार्यक्रम राबविण्यात आला. बुरकोणी येथे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाचे गावातील प्रमुख विनोद चाफले उपतालुका प्रमुख तथा विनोद मोहोड, सर्कल प्रमुख फटिंग यांनी या कार्यक्रमाचे नियोजन बुरकोणी या गावात अतिसुंदर केले.
तसेच अल्लीपूर या ठिकाणी झालेल्या सभेचे नियोजन गोपाल मेघरे सर्कलप्रमुख अल्लीपूर, नरड, व त्यांचे इतर सर्व कार्यकर्ते यांनीही उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. नंतर तालुक्यातील शेवटची सभा मोजरी (शेकापूर) येथे घेण्यात आली. या सर्व ठिकाणी जिल्हा संघटक भारत चौधरी यांनी परिश्रम घेऊन तालुक्यातील सर्व ठिकाणी “होऊ दे चर्चा” सभेचे नियोजन केले.
तसेच सातेफळ, बुरकोणी, अल्लीपूर व मोझरी या चारही सभेत सर्व खालील शिवसैनिक मोझरी येथील पंचायत समिती हिंगणघाट चे माजी उपसभापती अमोल गायकवाड, अनिल दुर्गे, सूर्यकांत ढुमणे, जितेंद्र साळवे. तसेच अल्लीपूर येथील दिलीप घुसे, चंद्रशेखर तडस, कृष्णाजी लोणारे. बुरकोनी येथील सुधाकर चापले, शंकर सातपुते, संतोष फटिंग, राजू मुंगले, सौ. वनिता कोराम, सौ.चंदा आत्राम, नरेश थूल, सौ. कविता चापले, सौ.चंदा फटिंग, गणपतराव मुंगले व गोविंदराव गुजरकर. तसेच सातेफळ येथील उप शाखा प्रमुख विलास बागडे, जयप्रकाश चंदेल, रमेश लाखे, शंकर अगडे, सौ. मनीषा माथुरकर, सौ. कांचन बागडे, चंदनखेडेताई, विठ्ठल मातुरकर, दशरथ तडस, महादेव चंदनखेडे व भैय्याजी वरघणे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…