जिवती तालुक्यातील पुनागुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या थाटामाटात साजरा.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- 1956 साली प.पु. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुर येथे आपल्या 5 लाख अनुयायांसह जगात सर्वात मोठा असा भव्य दिव्य धर्मांतर सोहळा पार पाडला व तेव्हा पासुन आजपर्यंत भारत देशामध्ये बौद्ध बांधव 14 आक्टोबंर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणुन दरवर्षी साजरा करतात.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिवती तालुक्यातील पुनागुडा ह्या गावात दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दिनांक 14 आक्टोबंर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पुनागुडा ग्राम पंचायतच्या सरपंचा श्रीमती रसिकाबाई जोंधळे तसेच उपसरपंच श्रीमती मथुराबाई मसुरे, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव गायकवाड तसेच जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक शेरकी, वंचित बहुजन आघाडी ता.जिवती युवा तालुका अध्यक्ष करण सुर्यवंशी वंचित बहुजन आघाडी पुनागुडा शाखेचे महासचिव पंकज मसुरे व अर्जुन सुर्यवंशी व मोठ्याप्रमाणात गावकरी मंडळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नविन मसुरे यांनी केले असुन कार्यक्रमाची सुरुवात सामुहीक त्रिशरण पंचशिले ने करण्यात आली आणि मान्यवरांनी भाषणाच्या माध्यमातुन जनतेसमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्धांचे विचार मांडले व प्रबोधन केले.आणी गावातील महिलांनी गायनाच्या माध्यमातुन प्रबोधन करुन धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

जय बजरंग बली आखाडा मंडळ वाघोलीच्या वतीने तान्हा पोळा निमित्त नंदी लकी ड्रॉ स्पर्धा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील जय बजरंग बली…

1 day ago

परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.

परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.

1 day ago

पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी हिंगणघाट येथे भगवान महावीर स्वामींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर…

1 day ago

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा सत्कार.

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा…

1 day ago