वर्धा जिल्ह्यातील 17 सराईत गुन्हेगारांना केलं तडीपार, पाेलीस अधीक्षक नूरुल हसन यांची माहिती.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक पाऊले उचलली आहे. त्याच मुळे वर्धा जिल्ह्यातील 17 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधी करिता या गुन्हेगारांकरिता तडीपार करण्यात आले. त्याबाबतचा प्रस्ताव पाेलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी मंजूर केला आहे.

वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यात ज्यांना गंभीर गुन्हे करण्याची सवयी आहे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगारबंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, शासकीय कर्मचार्‍यांवर हल्ला करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्याबाबात आदेश दिले हाेते.

त्यानुसार पोलीस स्टेशन वर्धा शहर, रामनगर, सेवाग्राम, सावंगी, सेलू व देहेगाव गोसावी ठाणेदार यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी प्रस्ताव मंजूर करीत वर्धा जिल्ह्यातील १७ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. यामध्ये रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत राजेश शामलाल जयस्वाल (रा. वर्धा), मनोज सुरेश जयस्वाल (रा. पोद्दार बगीचा वर्धा), मयूर देवराव तुपट (रा. गजानन नगर वर्धा), मोहन मोतीलाल कलसे (रा. इंदिरानगर, वर्धा) यांचा तडीपारीत समावेश आहे.

वर्धा पोलीस स्टेशन शहरअंतर्गत अक्षय दिगांबर पटले (रा. बोरगाव मेघे), सागर ज्ञानेश्वर घोडे (रा. बोरगाव मेघे), अमोल ऊर्फ बंदी महेंद्र शंभरकर (रा. तारफैल), अज्जु वासुदेव राठोड (रा. बोरगाव मेघे), मनीष प्रसादीलाल ताराचंदी (रा. आनंदनगर, वर्धा) यांनी यांचा तडीपार करण्यात आले आहे.
सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत चंद्रकांत पुरुषोत्तम लोहकरे (रा. वरुड), सुरेश किसनाजी मून (रा. मदनी), राहुल पंडीत ईखार (रा. पवनार), पोलीस स्टेशन सावंगी अंतर्गत योगेश दिवाकर पेटकर (रा. सावंगी मेघे), रोशन रामदास ठाकरे (रा. साटोडा), पोलीस स्टेशन सेलूअंतर्गत प्रवीण शत्रुघ्न धावडे (रा. तळोदी), किशोर गजानन पोटे (रा. सेलू), पोलीस स्टेशन दहेगावअंतर्गत पिंटू रामदास पवार (रा. हमदापूर) या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, रामनगरचे महेश चव्हाण, सेवाग्रामपचे चंद्रशेखर चकाटे, सावंगी (मेघे) चे धनाजी जळक, दहेगाव (गोसावी) चे योगेश कामले, सेलू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश नागापुरे, दिनेश करलुके यांनी केली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

जय बजरंग बली आखाडा मंडळ वाघोलीच्या वतीने तान्हा पोळा निमित्त नंदी लकी ड्रॉ स्पर्धा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील जय बजरंग बली…

1 day ago

परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.

परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.

1 day ago

पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी हिंगणघाट येथे भगवान महावीर स्वामींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर…

1 day ago

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा सत्कार.

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा…

1 day ago