कोरपना तालुक्यातील अंतरगाव बु, सांगोडा, हिरापूर, विरूर, गाडेगाव येथील विद्यार्थ्यांना त्रास
तिरुपती नाल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- कोरपना तालुक्यातील अंतरगाव बु, सांगोडा, हिरापुर, विरूर, गाडेगाव येथील विद्यार्थी गडचांदूर येथे शिक्षणाकरिता जातात परंतु परत गावी येताना सायंकाळची ५.३० वाजताची बससेवा नियमित वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर बससेवा नेहमी उशिरा येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना घरी यायला उशीर होत आहे. तसेच अनेकदा बसला उशीर झाल्यामुळे बस सेवा रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेकदा पालकांना विद्यार्थ्यांना स्वतः घेऊन यावे लागत आहे. तसेच तसेच सांगोला येथील विद्यार्थ्यांना गावात न सोडता सांगोडा फाट्यावरच विद्यार्थ्यांना सोडले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना गावी पायी जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर परिणाम होत आहे.
त्यामुळे गडचांदूर- अंतरगाव(बु)- विरूर गाडेगाव ही बस सेवा नियमितपणे वेळेवर सायंकाळी ५.३० वाजता सोडण्याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, अंतरगाव बु सरपंच नीताताई वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष, महादेव वडस्कर यांनी राजुरा आगार प्रमुख जयंत झाडे यांना निवेदन सादर केले.
यावेळी प्रतीक्षा वडस्कर, प्रतीक्षा ढवस पूर्वावडस्कर, सलोनी वडस्कर, तनवी आपटे, अक्षरा आपटे, योगेश्वरी लांडे, क्षितिज घोगरे, अहिंसक कांबळे, दिपाली सातपुते, चैतन्य सातपुते, सुजल वडस्कर, हिमानी काकडे, हर्षल आसुटकर, कशिश कोल्हे इत्यादी विद्यार्थी उपस्थीत होते.
तसेच आपण यापुढे गडचांदूर ते विरूर गाडेगाव ही बस सेवा नियमित वेळेवर सोडण्याकरिता उचित कारवाई करू अशे आश्वासन आगार प्रमुख जयंत झाडे यांनी दिले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…