पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन पुणे:- कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीत एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथे दुचाकीने जात असलेली एका व्यक्तीला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली त्यात गंभीर स्थितीत त्याचा मृत्यू झाला. अशोक बसन्ना अस्टगे, वय 60 वर्ष असे मयत इसमाचे नाव आहे. 15 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1.15 वाजता सुमारास व्ही आय टी कॉलेज समोर कोंढवा पुणे बुद्रुक पुणे येथे भीषण अपघात झाला.
व्हीव्हीआयटी कॉलेज कोंढवा येथील सार्वजनिक रोडवर अशोक हे त्यांचे दुचाकी क्रमांक MH 12 PD 0119 गाडीवरून जात असताना त्यांचे पाठीमागून येत असणाऱ्या डंपर क्रमांक एम एच MH 12 EQ1872 त्याची ताब्यातील वाहन हे हयगयीने व निष्काळजीपणांनी भरधाव वेगात चालविल्यामुळे डंपरच्या मागील चाकाखाली दुचाकी स्वार आल्याने डंपर चालकाने वाहतुकीचे नियमाकडे दुर्लक्ष करून गाडीचे नुकसान करून अशोक अष्टके यांना गंभीर जखमी करून त्याचे मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून सदर डंपर चालक नामदेव किसनराव केंद्रे यांच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
या घटनेची फिर्याद मृतकाच्या कुटुंबिय शरद बिभीषण सनादे व 28 धंदा व्यवसाय राहणार 692, प्रेम नगर वसाहत ,बुद्ध विहार जवळ मार्केट यार्ड पुणे यांनी दाखल केली. कोंढवा पोलिसांनी गु र नं 1066/2023 भादंवि कलम 304A, 279,338, 427, mv act 184, 119/ 177, 134 (A) (B) प्रमाणे नामदेव किसनराव केंद्रे, रा. येवलेवाडी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. पुढील तपास पूजा पाटील पोलीस उप निरीक्षक ,कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर हे करत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…